शरण येण्यास वेळ द्या; नवज्योत सिंह सिद्धू यांची न्यायालयाला विनंती

न्यायालय सिद्धू यांच्या विनंतीवर काय भूमिका घेणार; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था
Navjot singh sidhu
Navjot singh sidhuDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्यात 1988 च्या संध्याकाळी वाद झाला होता. यात 65 वर्षीय गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र सिद्धू यांच्या प्रकृतीचे कारण देत वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी शरण येण्यासाठी काही आठवड्यांचा अवधी मिळावा अशी विनंती न्यायालयास केली आहे. (Give time to surrender - Navjot Singh Sidhu )

सिद्धू आज पटियाला न्यायालयात हजर राहणार होते. मात्र, त्यांनी एक आठवड्याचा वेळ देण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यावर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमण यांना सुनावणीसाठी विनंती केली आहे. सिद्धूचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, सिद्धू यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव शरण येण्यासाठी काही आठवड्यांची विनंती केली आहे.

दरम्यान, सरन्यायाधीशांनी आतापर्यंत कोणत्याही खटल्याचा उल्लेख ऐकून घेण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत पटियाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरिंदर पाल लाली यांनी पक्ष समर्थकांना दिलेल्या माहितीत असे सांगितले होते की, सिद्धू सकाळी 10 वाजता न्यायालयात पोहोचणार आहेत. पक्षाच्या समर्थकांना सकाळी 9.30 वाजता न्यायालयाच्या आवारात पोहोचण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सिद्धूची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसरहून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पटियालाला पोहोचल्या आहेत. मात्र, अचानक सिद्धू यांनी शरण येण्यास वेळ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता न्यायालय नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विनंतीवर काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Navjot singh sidhu
नरेंद्र मोदींना आव्हान देण्याची क्षमता राहुल गांधींमध्ये आहे का? प्रशांत किशोरांनी दिलं उत्तर

काय आहे नेमकं प्रकरण ?

रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाकडून झटका मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने जुना आदेश बदलून 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण 1988 सालचे आहे. या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी सिद्धू यांना 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

Navjot singh sidhu
SC ने पेगासस प्रकरणाच्या चौकशी समितीचा 4 आठवड्यांनी वाढवला कालावधी

याआधी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती की, हे प्रकरण 33 वर्षे जुने आहे. सुप्रीम कोर्टाने या खटल्यातील शिक्षेला स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे पीडितेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या या याचिकेत नोटीसची व्याप्ती वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. पटियाला येथे 1988 मध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात पार्किंगवरून वाद झाला होता, त्यात गुरनाम सिंग या वृद्धाचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com