Punjab Assembly Election 2022 Dainik Gomantak
देश

चर्च, मंदिर-मशीद आणि गुरुद्वारामध्येही जातो पण...: नवज्योतसिंग सिद्धू

सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने जनतेला वेठीस धरण्यात व्यस्त आहेत, यातचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी ख्रिश्चनांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडलीली नाही.

दैनिक गोमन्तक

पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुक 2022 (Punjab Assembly Election 2022) साठी मतदान होणार आहे. याआधी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने जनतेला वेठीस धरण्यात व्यस्त आहेत, याच क्रमाने काल काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी ख्रिश्चनांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडलीली नाहीये. अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी गेलेले सिद्धू म्हणाले की, मी चर्च, मंदिर-मशीद आणि गुरुद्वारामध्येही (Gurudwara) जातो. ''जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत कोणीही ख्रिस्ती धर्माकडे डोळसपणे पाहू शकत नाही,'' असं ही ते या वेळी म्हणाले.

सिद्धू म्हणाले की, मी चर्च, मशीद, गुरुद्वारा आणि अलीकडे वैष्णोदेवीलाही भेट दिली आहे. सर्वांना समान कायदा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला खात्री देतो की, कोणीही ख्रिस्ती धर्मावर वाईट नजर टाकू शकत नाही. नवज्योत सिंग सिद्धू नुकतेच वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते, आठवडाभरातील त्यांची ही दुसरी भेट होती. ते सर्व सिद्धू हिंदूंना आकर्षित करण्यासाठी करत आहेत असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

पंजाबमधून सिद्धू यांच्यासमोर अकाली दलाचे बिक्रम सिंह मजिठिया निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याने ही जागा हॉट सीट बनली आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हिंदू लोकसंख्या असल्याचे निवडणूक तज्ज्ञांचे मत आहे, त्यामुळेच हिंदू समाजाला आकर्षित करण्यासाठी ते वैष्णोदेवीची यात्रा करत आहेत असं ही ते या वेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: आता डंप हाताळणी 'सावधानतेने'! डीपीआर आवश्यक; कोट्यवधींची बँक हमीही द्यावी लागणार

Goa Police: तीन पोलिस निलंबित, तर दोघांवर शिस्तभंग; गोळीबार, एडबर्ग मारहाण प्रकरणी कारवाई

सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी.... ब्राझीलमधील मॉडेलचा फोटो वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान; राहुल गांधी यांचा नवा खुलासा

SPPU Rice Research: साध्या तांदळालाही 'बासमती'चा सुवास, जनुकीय बदलानंतर नवे वाण विकसित; 'एसपीपीयू'चे अनोखे संशोधन

Mapusa: 'पाकिस्तान झिंदाबाद', डिजिटल बोर्डमुळे गोंधळ; दोन आस्थापनांच्या 9 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; हडफडे, कळंगुटमधील प्रकार

SCROLL FOR NEXT