Navjot Singh Sidhu Dainik Gomantak
देश

तुरुंगातून बाहेर येताच सिद्धू यांची डरकाळी, राहुल, प्रियांका गांधींची भेट घेत म्हणाले, एक इंच देखील...

रोड रेज घटनेप्रकरणी नवज्योत सिद्धू पंजाबच्या पटियाला येथे 10 महिने तुरुंगात होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Navjot Singh Sidhu: तुरुंगातून 10 महिन्यांनंतर मुक्त झालेले क्रिकेटपटू-राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांची भेट घेतली. सिद्धू यांनी या खास भेटीचे छायाचित्र ट्विट केले आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विटरवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. "माझे गुरु राहुल जी आणि मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक प्रियंका जी यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. तुम्ही मला तुरुंगात टाकू शकता, मला धमकावू शकता, माझे आर्थिक व्यवहार ब्लॉक करू शकता. पण पंजाब आणि माझे नेते यांच्याशी असलेली माझी बांधिलकी झुकणार नाही ना एक इंचही मागे हटेल!!" असे कॅप्शन सिद्धू यांनी फोटोला लिहले आहे.

34 वर्षांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या रोड रेज घटनेप्रकरणी नवज्योत सिद्धू पंजाबच्या पटियाला येथे 10 महिने तुरुंगात होते. या प्रकरणात त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि मे महिन्यात त्यांची सुटका होण्याची अपेक्षा होती, परंतु "चांगल्या वागणुकीमुळे" त्यांना लवकर सोडण्यात आले.

नवज्योत सिंग सिद्धू हे काँग्रेसचे फायरब्रॅन्ड नेते आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर पंजाब काँग्रेसमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. पक्षातील हायकमांड त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काँग्रेसने चरणजित सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली, ज्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमृतसर पूर्व विधानसभेतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा आम आदमी पक्षाच्या जीवन ज्योत कौर यांच्याकडून पराभव झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT