Farmers Protest Dainik Gomantak
देश

Farmers Protest: पंजाबमध्ये किसान मोर्चाचे 'रेल रोको' आंदोलन, सरकारविरोधात व्यक्त केला संताप

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज पंजाबमध्ये केंद्र सरकारविरोधात रेल रोको आंदोलन करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Farmers Protest Over MSP: संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज पंजाबमध्ये केंद्र सरकारविरोधात रेल रोको आंदोलन करण्यात आले. सरकारने एमएसपी समितीबाबत दिलेल्या आश्वासनाचे उल्लंघन केले असून, किसान आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हेही परत करण्यात आले नाहीत, असा आरोप मोर्चाने केला आहे. शहीद उधम सिंह यांच्या हुतात्मा दिनानिमित्त पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा परिणाम पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागात दिसून आला.

संयुक्त किसान मोर्चाच्या हाकेवर शेतकऱ्यांनी रविवारी रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला. शेतकऱ्यांनी तीन वाजेपर्यंत रेल्वे रुळावर ठिय्या मांडून केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. दिल्लीतील शेतकरी आंदोलन संपवण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ पंजाब आणि हरियाणामध्ये ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने करत रेल्वे ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केले.

3 ऑगस्टला पुन्हा निदर्शने करण्याची घोषणा केली

संयुक्त किसान मोर्चाने येत्या 3 ऑगस्टला पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यावेळी राज्यातील आम आदमी पार्टी सरकारच्या विरोधात हे निदर्शने होणार आहे. ऊस व कापसाला शासनाने अद्यापही मोबदला दिला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भारतीय किसान युनियन (सिधुपूर)चे अध्यक्ष जगजीत सिंह यांनी मांझा आणि माळवा येथे शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचे म्हटले आहे.

केंद्राचा एमएसपी नाकारला

दळेवाल यांनी केंद्राने स्थापन केलेली किमान आधारभूत किंमत समितीही नाकारली आणि म्हणाले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली शेतकरी संघटना 22 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर दिवसभराचा उत्सव साजरा करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT