National Herald House  Dainik Gomantak
देश

National Herald Case: यंग इंडियाचे कार्यालय ईडीने केले सील

National Herald Money Laundering Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीच्या अधिकाऱ्यांनी नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील केले आहे.

दैनिक गोमन्तक

National Herald Money Laundering Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीच्या अधिकाऱ्यांनी नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'एजन्सीच्या परवानगीशिवाय कार्यालय सुरु करता येणार नाही.' नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केली आहे.

दरम्यान, नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून (ED) कारवाई सुरु आहे. ईडी अधिकाऱ्यांनी नॅशनल हेराल्ड कार्यालयाच्या 14 ठिकाणी छापे टाकले. बुधवारी एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील केले. परवानगीशिवाय कार्यालय सुरु करण्यात येऊ नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

काँग्रेस मुख्यालयात सुरक्षा वाढवण्यात आली

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या नॅशनल हेराल्ड कार्यालयाला सील ठोकण्याच्या कारवाईनंतर खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेस मुख्यालयात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबतच काँग्रेस (Congress) कार्यालयाबाहेरील रस्ताही बंद करण्यात आला आहे. कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस नेते रस्त्यावर उतरुन आंदोलन करु शकतात, अशी भीती पोलिसांना आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्विट करत म्हटले की, "दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एआयसीसी मुख्यालयाकडे जाणारा मार्ग रोखला आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT