Rahul gandhi Dainik Gomantak
देश

National Herald Case: काँग्रेस नेत्या आक्रमक; थेट धरली पोलीसाची 'कॉलर'

नॅशनल हेराल्ड प्रकरणावरुन देशाच्या अनेक भागात आंदोलने सुरु;काँग्रेस कार्यकर्ते ही आक्रमक

दैनिक गोमन्तक

नॅशनल हेराल्ड प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालय सुरु ठेवली आहे. याबाबत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहूल गांधी हे ईडीमध्ये हजर झाल्याने संतप्त झालेले काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्याकडून आक्षेपार्ह कृत्य केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. (National Herald case: Congress leaders aggressive; Directly caught police 'collar' )

हैदराबादमध्ये सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी एका पोलिसाची कॉलर पकडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलीस त्यांना माघार घ्यायला सांगत आहे. याप्रकरणी भाजपने आता रेणुका चौधरी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांच्या अटकेबाबत निदर्शने तीव्र करताना तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेस नेत्यांच्यावतीने निदर्शने होऊ लागली आहेत. महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांसह पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे नॅशनल हेराल्ड केस

भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2013 मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर फसवणूक आणि निधीच्या गैरव्यवहाराचा कट रचल्याचा आरोप केला होता. स्वामींनी दावा केला होता की, यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी केवळ 50 लाख रुपये दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT