Farooq Abdullah Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: गुपकार युती तुटली! नॅशनल कॉन्फरन्स स्वतंत्र निवडणूक लढवणार

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सने बुधवारी मोठी घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सने बुधवारी मोठी घोषणा केली. बुधवारी स्पष्ट संकेत देत नॅशनल कॉन्फरन्सने सांगितले की, 'जेव्हा राज्यात निवडणुका होतील, तेव्हा आम्ही सर्व 90 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहोत.' नॅशनल कॉन्फरन्सच्या या संकेतानंतर जम्मू-काश्मीरमधील गुपकार युती तुटण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu And Kashmir) निवडणुकांपूर्वी, पक्षाच्या काश्मीर प्रांतीय समितीने एकमताने ठराव मंजूर केला की, 'नॅशनल कॉन्फरन्सने सर्व 90 जागा लढवण्याची तयारी ठेवावी.' पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, सरचिटणीस अली मोहम्मद सागर आणि काश्मीर प्रदेशाचे संपूर्ण नेतृत्व एनसी मुख्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित होते, त्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला.

पाच पक्षांची युती

4 ऑगस्ट 2019 रोजी, जम्मू आणि काश्मीरमध्ये पीपल्स अलायन्स ऑफ गुपकार डिक्लेरेशन (PAGD) नावाने पाच पक्षांची युती स्थापन करण्यात आली होती. नॅशनल कॉन्फरन्सशिवाय मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांचा पक्ष पीडीपी, सीपीए, अवामी नॅशनल कॉन्फरन्स आणि सीपीआय (CPI) यांचा यात समावेश आहे. 2020 च्या जिल्हा विकास परिषद निवडणुकीत, युतीने 280 पैकी 110 जागा लढवल्या आणि जिंकल्या, एकट्या NC ने 67 जागा जिंकल्या होत्या.

मतदार म्हणून नोंदणी करण्यावर भर

नॅशनल कॉन्फरन्सने निवडणूक लढविण्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही, मात्र पीडीपी (PDP) नेतृत्वाच्या अलीकडच्या काही विधानांशी त्याचा संबंध जोडला जात आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत, राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी लोकांना मतदार म्हणून नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे उद्धृत केले. नॅशनल कॉन्फरन्सने सांगितले की, 'जम्मू आणि काश्मीरशी संबंधित मुद्द्यांवर, विशेषत: "मतदार यादीत गैर-स्थानिक मतदारांचा समावेश" या विषयावर बैठकीत चर्चा झाली.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT