NCSC Sandeshkhali Visit ANI
देश

NCSC Sandeshkhali Visit: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे पथक पोहोचले संदेशखळीत; अध्यक्ष म्हणाले...

Sandeshkhali Violence: प्रसारमाध्यमांशी बोलताना आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर म्हणाले की, स्थानिक लोकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही.

Manish Jadhav

NCSC Sandeshkhali Visit: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या (NSCS) पथकाने गुरुवारी पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त संदेशखळीला भेट दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर म्हणाले की, स्थानिक लोकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे प्रबळ नेते शजहान शेख यांच्या समर्थकांकडून होणाऱ्या हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (एनसीएससी) अध्यक्ष अरुण हलदर म्हणाले की, ते हिंसाचारग्रस्तांचा अहवाल सादर करणार आहेत. नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट (NCSC) चे एक शिष्टमंडळ पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त संदेशखळी भागात परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि पीडितांचे म्हणणे ऐकण्यासाठी पोहोचले. येथील महिला हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांच्या नेतृत्वाखालील टीमने संदेशखळीमधील रहिवाशांशी बातचित केली, जिथे प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि इतर मागास समुदायातील लोक राहतात.

दुसरीकडे, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांकडून स्थानिक लोकांवर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात संदेशखळी येथे निदर्शने सुरु आहेत. दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांना संदेशखळीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही भाजप नेत्यांना तिथे न जाण्याची विनंती करत आहोत आणि ते परत येतील अशी आशा आहे." पश्चिम बंगाल विधानसभेतील भाजप आमदारांनी संदेशखळीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरले. भाजपने यावेळी आरोपांची राळ उठवली. संदेशखळी येथे बुधवारी सलग सातव्या दिवशी निदर्शने सुरु राहिली, जिथे मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या अटकेची मागणी केली.

दुसरीकडे, शाहजहान आणि त्यांच्या साथीदारांवर जबरदस्तीने जमिनीवर कब्जा करणे आणि महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात कथित रेशन घोटाळ्याच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचे पथक शाहजहान यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी पोहोचले असता जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. गेल्या महिनाभरापासून ते फरार होते.

दरम्यान, संदेशखळी येथील हिंसाचारावरुन भाजपने पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर हल्ला करणे सुरुच ठेवले आहे, भाजप खासदार दिलीप घोष यांनी गुरुवारी आरोप केला की, मुख्य ममता बॅनर्जी त्यांच्या शाहजहान शेख सारख्या नेत्यांना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांकडून संरक्षण देत आहेत. तसेच, महिलांच्या कथित लैंगिक छळाच्या विरोधात भाजपच्या प्रदेशाध्यक्षा सुकांता मजुमदार यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बसिरहाट उपविभागातील संदेशखळी भागात मंगळवारी तणाव निर्माण झाला.

तसेच, केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची उच्चस्तरीय समितीच्या निमंत्रकपदी निवड करण्यात आली आहे. प्रतिमा भौमिक, भाजप खासदार सुनीता दुग्गल, कविता पाटीदार, संगीता यादव आणि ब्रिजलाल या पॅनलचे इतर सदस्य आहेत. त्यांना घटनास्थळी भेट देण्याचे, परिस्थितीचा आढावा घेण्याचे, पीडितांशी बोलण्याचे आणि भाजप पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण

पश्चिम बंगालमधील संदेशखळी भागात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. येथे गावातील काही महिलांनी टीएमसी नेते शेख शाहजहान आणि त्यांच्या समर्थकांवर लैंगिक शोषण आणि जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी महिलांसह मोठ्या संख्येने लोक आंदोलन करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT