India
India Dainik Gomantak
देश

"छोटी सोच": प्रेषित वादावरील इस्लामिक सहकार्य संघटनेच्या वक्तव्यावर भारत म्हणाला...

दैनिक गोमन्तक

इंडोनेशिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) बहरीन आणि अफगाणिस्तान सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या ( BJP) नेत्या नुपूर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करणाऱ्या आणि सर्व धार्मिक श्रद्धांना पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम देशांमध्ये सामील झाले आहेत. (Narrow Minded India On Organization Of Islamic Cooperations Remarks On Prophet Controversy)

दरम्यान, जेद्दाहस्थित ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) ने भाजपचे (BJP) प्रवक्ते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, ही वक्तव्ये भारतातील इस्लामचा द्वेष, गैरवर्तन आणि मुस्लिमांविरुद्धचा तिरस्कार दर्शवतो.

दुसरीकडे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारत (India) "ओआयसी सचिवालयाच्या वक्तव्याचं खंडण करतो. भारत सरकार सर्व धर्मांचा आदर करते." ते पुढे म्हणाले की, 'धार्मिक व्यक्तिमत्त्वाची बदनामी करणारे आक्षेपार्ह ट्विट आणि टिप्पण्या काही व्यक्तींनी केल्या आहेत. ते कोणत्याही प्रकारे भारत सरकारच्या विचारांचे प्रतिबिंब नाही. संबंधित संस्थांकडून या व्यक्तींवर यापूर्वीच कठोर कारवाई करण्यात आली आहे.'

शिवाय, OIC ही मुस्लिम बहुसंख्य देशांची आंतरसरकारी संस्था आहे, ज्याच्या सदस्य देशांमध्ये पाकिस्तानचा (Pakistan) समावेश आहे. भारताने अनेकदा देशाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्यासाठी ओआयसीवर टीका केली आहे. OIC अनेकदा जम्मू-काश्मीरशी (Jammu and Kashmir) संबंधित विषयांवरही भाष्य करत असते. संघटना स्वतःला "मुस्लिम जगताचा सामूहिक आवाज" म्हणते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT