Narendra Modi's Mann ki Batt: Follow COVId-19 protocol i n Festival's Dainik Gomantak
देश

'सण साधेपणाने साजरे करा' पंतप्रधानांची 'मन की बात'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Prime Minister Narendra Modi) आज आपल्या ‘मन की बात’(Mann Ki Baat ) या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला आहे .

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Prime Minister Narendra Modi) आज आपल्या ‘मन की बात’(Mann Ki Baat ) या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला आहे .या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी टोकियोला(Tokyo Olympics 2021) गेलेल्या आपल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्सहान देण्यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे.त्याचबरोबर मोदींनी कोरोनाची(COVID-19) आठवण करून देतानाच लोकांनी गांभीर्यांने विचार करावा असा सल्लाही दिला आहे. मोदींनी लोकांना असा इशारा दिला की सणांच्या(Indian Festivals) काळात कोरोना व्हायरस आपल्या मधून गेला नाही हे विसरू नका. म्हणूनच कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

या आपल्या मन की बात मध्ये त्यांनी अनेक महत्वांच्या मुद्द्यावही चर्चा केली आहे, मोदींनी नेमके कुठले मुद्दे या आपल्या भाषणात मांडले ते पाहू..

Tokyo Olympics: खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे आवाहन

भाषणाच्या सुरूवातीस पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आणि लोकांना भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे आवाहनही केले आहे . ते म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंगा पाहून संपूर्ण देश रोमांचित झाला होता. हे खेळाडू जेव्हा भारतातून गेले तेव्हा मला त्यांच्याशी गप्पा मारण्याची, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची आणि देशाला सांगण्याची संधी देखील मिळाली. जीवनाच्या अनेक आव्हानांवर विजय मिळवून हे खेळाडू येथे पोहोचले आहेत.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

कारगिल युद्धाची वीर कथा वाचण्याचे आवाहन

पीएम मोदी म्हणाले की उद्या म्हणजे म्हणजे 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस आहे. कारगिल युद्ध हे भारतीय सैन्यातील शौर्य आणि संयम यांचे प्रतीक आहे. यावेळी हा गौरवशाली दिवसही अमृत महोत्सवाच्या मध्यभागी साजरा केला जाईल. म्हणूनच ते आणखी विशेष बनते. मी तुम्हा सर्वांना कारगिलची थरारक कथा वाचण्यासाठी आवाहन करतो आणि आपण सर्व कारगिलच्या नायकांना नमन करूयात. असेही मोदी यांनी सांगितले आहे.

स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याचा आम्हाला अभिमान आहे: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावेळी 15 ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी प्रवेश करीत आहे. हे आपले मोठे भाग्य आहे की आम्ही स्वातंत्र्याची 75 वर्षे साक्ष देत आहोत ज्यासाठी देशाने शतकानुशतके प्रतीक्षा केली.तुम्हाला आठवत असेल की स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी १२ मार्च रोजी बापूंच्या साबरमती आश्रमातून अमृत मोहोत्सवाला सुरवात झाली होती. बापूंची दांडी यात्राही या दिवशी पुनरुज्जीवित करण्यात आली, तेव्हापासून जम्मू-काश्मीर ते पुडुचेरी, गुजरात ते ईशान्य पर्यंत, देशभरात 'अमृत महोत्सव' संबंधित कार्यक्रम सुरू आहेत.

लोकल फॉर व्होकलसाठी आग्रही

पंतप्रधान मोदी म्हणाले की व्होकल फॉर पीपल सारखे दररोज काम करून आपण देशाची उभारणी करू शकतो. आपल्या देशातील स्थानिक उद्योजक, कलाकार, कारागीर, विणकरांना मदत करण्याची इच्छा आपल्याला असली पाहिजे.

कोरोनाचे प्रोटोकॉल अनुसरण करा

या दरम्यान, पीएम मोदी म्हणाले की, सणांच्या वेळी कोरोना विषाणू आपल्यात गेला नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच आपल्याला कोरोना प्रोटोकॉल अनुसरण करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

SCROLL FOR NEXT