Narayana Murthy Dainik Gomantak
देश

Narayana Murthy: ‘मी स्वतः 85-90 तास काम केले...’; नारायण मूर्तींनी सांगितले यशाचे रहस्य!

Infosys Co-Founder Narayana Murthy Success Tips: इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी देशातील तरुणांना यशाची शिखरे गाठण्याचा सल्ला दिला होता.

Manish Jadhav

Infosys Co-Founder Narayana Murthy Success Tips: इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी देशातील तरुणांना यशाची शिखरे गाठण्याचा सल्ला दिला होता. चीनला मागे टाकायचे असेल तर आठवड्यातून किमान 70 तास काम केले पाहिजे. कामाची प्रोडक्टिविटी वाढवावी लागेल. या सल्ल्यावर देशभरातून आलेल्या प्रतिक्रिया पाहता नारायण मूर्ती आता पुन्हा एकदा समोर आले आहेत. आता त्यांनी आपल्या यशाचे गमक देशातील तरुणांना सांगितले. ते म्हणाले की, मला माझ्या आई-वडिलांनी एक मंत्र दिला होता आणि मी स्वत: माझ्या कामाच्या दिवसात आठवड्यातून 85 ते 90 तास काम केले, त्याचेच फळ आज मी इथे आहे.

''घड्याळ्याच्या काट्यावर काम करु नका, फक्त कठोर परिश्रम करा''

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नारायण मूर्ती म्हणतात की, ''आज जो आपला देश समृद्ध दिसत आहे, त्यामध्ये प्रत्येकाने हातभार लावला आहे. चीन आज पहिल्या क्रमांकाचा देश आहे कारण तिथे कठोर परिश्रम केले जाते. कठोर परिश्रम आणि अधिक तास केले जाते. जेव्हा मी माझी कंपनी स्थापन केली तेव्हा मी स्वतः बरेच तास काम केले. 1994 पर्यंत मी आठवड्यातून 85 ते 90 तासांपेक्षा जास्त काम केले. मी सकाळी 6:20 वाजता ऑफिसमध्ये असायचो आणि रात्री 8:30 वाजता ऑफिसमधून निघायचो आणि आठवड्यातून 6 दिवस काम करायचो. माझ्या आई-वडिलांनी मला एकच धडा दिला की, गरिबी संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कठोर परिश्रम. जेव्हा एखादी व्यक्ती तास लक्षात घेऊन काम करत नाही तेव्हा हे घडते.''

कामाची प्रोडक्टिविटी वाढवूनच तुम्हाला यश मिळेल

नारायण मूर्ती सांगतात की, ''मी माझ्या करिअरसाठी 40 वर्षे दिली. आठवड्यातून 70 तासांपेक्षा जास्त काम केले. भारताला चीन आणि जपानसारख्या वेगाने वाढणाऱ्या देशांशी स्पर्धा करायची असेल, तर कामाची प्रोडक्टिविटी वाढवणे आवश्यक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर, जर्मनी आणि जपानमधील लोकांनी आपल्या देशासाठी अतिरिक्त तास काम केले. भारतातील तरुण हे देशाचे मालक आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी कठोर परिश्रम करतात, परंतु त्यात अजूनही अंतर आहे.''

काही उद्योजकांनी या सूचनेशी सहमती दर्शवली नाही

X वर एक पोस्ट करत ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल म्हणाले की, 'मी नारायण मूर्ती यांच्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे. ही वेळ कमी काम करण्याची आणि स्वतःचे मनोरंजन करण्याची नाही.' उद्योगपती सज्जन जिंदाल यांनीही मूर्ती यांच्या वक्तव्याचे मनापासून समर्थन करत असल्याचे सांगितले. भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशाला 5 दिवसांच्या आठवड्याच्या संस्कृतीची गरज नाही. मात्र, बरेच लोक या विधानाशी पूर्णपणे सहमत नाहीत. दुसरीकडे, चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला म्हणाले की, प्रोडक्टिविटी वाढवणे केवळ जास्त तास काम करणे असू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT