Narayana Murthy: 'मनमोहन सिंगांच्या काळात देशातील आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या'

Narayana Murthy Big Statement: देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इन्फोसिसने आपला ठसा उमठवला आहे.
Narayana Murthy
Narayana MurthyDainik Gomantak
Published on
Updated on

Narayana Murthy Big Statement: देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इन्फोसिसने आपला ठसा उमठवला आहे. यातच आता इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले की, 'मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात भारतातील आर्थिक घडामोडी "ठप्प" झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात निर्णय घेतले जात नव्हते.' तरुण उद्योजकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

दरम्यान, एका प्रश्नाला उत्तर देताना नारायण मूर्ती म्हणाले की, 'मी लंडनमध्ये (London) (2008 ते 2012 दरम्यान) एचएसबीसीच्या बोर्डावर होतो. पहिल्या काही वर्षांत, जेव्हा बोर्डरुममध्ये (बैठकांमध्ये) चीनचा दोन-तीन वेळा उल्लेख केला जायचा, तेव्हा भारताचे नाव एकदाच येत असे.” मूर्ती पुढे म्हणाले, काय झाले? (माजी पंतप्रधान) मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे एक असामान्य व्यक्ती आहेत. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. परंतु यूपीएच्या काळात भारताची (India) प्रगती ठप्प झाली होती. निर्णय घेतले जात नव्हते.'

Narayana Murthy
Indian Railways: वंदे भारत ट्रेनबाबत अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट, वाचा सविस्तर

दुसरीकडे, जेव्हा त्यांनी HSBC सोडले (2012 मध्ये), तेव्हा भारताचा उल्लेख मीटिंगमध्ये क्वचितच केला गेला जायचा, तर चीनचे नाव सुमारे 30 वेळा घेतले गेले. मूर्ती शेवटी म्हणाले की, आज जगभरात भारताबद्दल आदराची भावना आहे. विशेष म्हणजे, भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com