'Muslim women should not go to male beauty parlors', Deobandi Ulema Mufti Asad Qasmi's fatwa. 
देश

'पुरुष असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये मुस्लिम महिलांनी जाऊ नये', देवबंदी उलेमा मुफ्ती असद कासमी यांचा फतवा

मुस्लिम महिलांनी अशा पार्लरमध्ये जाऊ नये, जिथे पुरुष काम करतात. कारण अशा ब्युटी पार्लरमध्ये जाणे बेकायदेशीर आणि हराम आहे, असे ते म्हणाले.

Ashutosh Masgaunde

'Muslim women should not go to male beauty parlors', Deobandi Ulema Mufti Asad Qasmi's fatwa:

मुस्लीम महिलांनी जिथे पुरुष काम करतात त्या पार्लरमध्ये जाऊ नये, असे देवबंदी उलेमा मुफ्ती असद कासमी यांनी म्हटले आहे.

जिथे पुरुष काम करतात त्या ब्युटी पार्लरला मुस्लिम महिलांनी भेट देणं हराम, बेकायदेशीर आहे. मुस्लीम महिला अशात ब्युटी पार्लरमध्ये जाऊ शकतात, जिथे मुली किंवा महिला काम करतात, असे मुफ्ती म्हणाले.

देवबंदी उलेमा मुफ्ती असद कासमी यांनी मुस्लिम महिलांना पुरुष काम करणाऱ्या ब्युटी पार्लरमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.

मुस्लिम महिलांनी अशा पार्लरमध्ये जाऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. पुरुष काम करतात अशा ब्युटी पार्लरमध्ये जाणे बेकायदेशीर आणि हराम आहे, असे ते म्हणाले.

मुफ्ती असद कासमी म्हणतात की, मुस्लिम महिलांनी फक्त त्या ब्युटी पार्लरमध्ये जावे ज्यामध्ये मुली आणि महिला काम करतात. जिथे पुरुष काम करतात तिथे जाणे चुकीचे आहे.

मुफ्ती असद कासमी यांनी संभलचे खासदार शफीकुर रहमान यांच्या विधानाचे समर्थन करताना सांगितले की, 17 तारखेला सर्वांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ प्रार्थना करावी. पॅलेस्टाईनमध्ये वृद्ध, मुले, तरुण आणि महिला शहीद होत आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तेथे शांतता असावी आणि निष्पाप लोक मारले जात आहेत. त्यांना मारणे थांबले पाहिजे आणि तेथे सुरू असलेले युद्ध देखील लवकर थांबले पाहिजे.

मुफ्ती असद कासमी म्हणाले की, नमाज फक्त तुमच्या घरात किंवा मशिदीमध्येच अदा करावी. कोणीही रस्त्यावर उतरून निषेध किंवा घोषणाबाजी करू नये. पॅलेस्टाईनमध्ये ज्या पद्धतीने गुन्हे केले जात आहेत ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

कासमी म्हणाले की मी हे स्पष्ट करू इच्छितो की, दुआ म्हणजे आपापल्या प्रार्थनास्थळांमध्ये बसून शांततेत प्रार्थना करणे. आपल्या घरात बसून प्रार्थना करावी. याचा अर्थ रस्त्यावर उतरून निदर्शने करावीत असा नाही. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या प्रार्थनास्थळी मनापासून बसून अत्याचारितांसाठी प्रार्थना करा.

याआधी जमियत-उलामा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी गाझामधील बॉम्बस्फोटांवर टीका करत पॅलेस्टिनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत, तर इस्रायली हल्ले करत आहेत, असे म्हटले आहे.

पॅलेस्टाईन आपला देश आणि तेथील जनतेला वाचवण्यासाठी बलिदान देत आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध अरब देशांपर्यंत पोहोचले तर त्याचे परिणाम भयानक होतील, असेही ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

SCROLL FOR NEXT