Mumbai Airport broke its own record, with 1032 flights taking off and landing in a single day:
दिवाळी सणाच्या दरम्यान मुंबई विमानतळावरून एक हजाराहून अधिक उड्डाणांची एअर ट्रॅफिक मुव्हमेंट नोंद झाली.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिवाळीच्या आठवड्यात म्हणजे 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 516,562 प्रवाशांनी उड्डाण केले.
तर 11 नोव्हेंबर रोजी 1032 विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग झाले. सीएसएमआयएसाठी ही मोठी उपलब्धी आहे.
यापूर्वी एकाच दिवसात सर्वाधिक उड्डाणे करण्याचा विक्रम पाच वर्षांपूर्वी नोंदवला गेला होता. 9 डिसेंबर 2018 रोजी एकाच दिवसात 1004 उड्डाणे झाली. अशाप्रकारे मुंबई विमानतळाने आपलाच जुना विक्रम मोडला आहे.
याशिवाय 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान बहुतांश लोकांनी देशांतर्गत मार्गावर प्रवास केला. त्यापैकी बहुतेक दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नईच्या फ्लाइटचा समावेश आहे.
तर आंतरराष्ट्रीय मार्गांवर दुबई, लंडन, अबू धाबी आणि सिंगापूर या शहरांमध्ये सर्वाधिक उड्डाणे होती. 11 नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावरून एका दिवसात 1,032 उड्डाणे करून एकूण 161,419 प्रवाशांनी प्रवास केला. ज्यामध्ये 107,765 देशांतर्गत प्रवासी आणि 53,680 प्रवाशांनी परदेशात प्रवास केला.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विट करून मुंबई विमानतळाच्या रेकॉर्डबाबत माहिती दिली आहे.
अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, तुमच्या सहकार्यासाठी आणि प्रयत्नांबद्दल अभिनंदन."
या वेळी दिवाळीच्या काळात मुंबई विमानतळावरून ३,५४,५४१ प्रवाशांनी देशांतर्गत मार्गांवर, तर १,६२,०२१ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाणे घेतली. एकूण 2,137 देशांतर्गत उड्डाणे आणि 757 आंतरराष्ट्रीय उड्डाणे सह, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने 2,894 हवाई वाहतूक हालचाली हाताळल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.