Muslim Leader Al Issa India Visit Dainik Gomantak
देश

Muslim Leader Al Issa India Visit: मुस्लिम नेते अल इसा यांचा भारत दौरा का आहे खास, जाणून घ्या

Al Issa India Visit: समान नागरी संहिता (UCC) बाबत देशात चर्चेने जोर धरला असताना, एका परदेशी नेत्याच्या दौऱ्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Manish Jadhav

Muslim Leader Al Issa India Visit: समान नागरी संहिता (UCC) बाबत देशात चर्चेने जोर धरला असताना, एका परदेशी नेत्याच्या दौऱ्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस मोहम्मद बिन अब्दुल करीम अल-इसा सोमवारी राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत.

अल-इसा यांची सौदी अरेबियातील बड्या नेत्यांमध्ये गणना केली जाते. ते मुस्लिम जगताचा मोठा चेहरा आहेत. अल-इसा यांची भारत भेट इतकी चर्चेत का आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करुया...

अल-इसा कोणाला भेटणार?

अल-इसा आपल्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर 10 जुलै रोजी नवी दिल्लीला पोहोचले आहेत. येथे ते प्रथम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांची भेट घेतील.

यानंतर, 11 जुलै रोजी ते दिल्लीतील आयआयसी केंद्रात एका कार्यक्रमाला संबोधित करतील, जिथे अजित डोभाल देखील उपस्थित असतील. याशिवाय त्या अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना भेटू शकतात, त्यांच्या दौऱ्यात त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

तसेच, अल इसा येथे काही मुस्लिम नेते, धार्मिक नेते आणि बड्या लोकांना भेटू शकतात. शुक्रवारी ते जामा मशिदीत जाऊन नमाज अदा करणार आहेत, तसेच आग्रा (Agra) येथील ताजमहालला भेट देण्याचाही त्यांचा कार्यक्रम आहे. पाच दिवसांच्या झंझावाती दौऱ्यातून ते मोठा संदेश देऊ शकतात.

अल इसा यांची भेट का खास?

मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस म्हणून नव्हे तर सौदी अरेबियाचे कायदा मंत्री म्हणूनही अल इसा यांचे असे अनेक निर्णय आहेत, जे चांगलेच चर्चेत आले. कायदा मंत्री असताना त्यांनी महिलांसाठी अनेक सुधारणा केल्या, कौटुंबिक आणि मानवतावादी बाबींमध्ये त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णयही चर्चेत आले.

संयमी भूमिका घेणारा आणि कट्टरतावादाच्या विरोधात बोलणारा मुस्लिम नेता अशी अल इसा यांची प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळेच देशात यूसीसीची चर्चा सुरु असताना त्यांची भारत भेट अत्यंत महत्त्वाची ठरते. इस्लाम आणि इतर धर्म आणि सभ्यता यांच्यातील संवादाचा मार्ग खुला करण्यासाठी अल इसा यांनी अनेकदा पुढाकार घेतला आहे.

या दौऱ्याचे महत्त्व काय?

दुसरीकडे, अल इसा यांची भेट स्वतःच खास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुस्लीम संघटना आणि अनेक राजकीय पक्ष या कायद्याच्या विरोधात राहिलेल्या विधानानंतर यूसीसीवरील चर्चेला जोर आला. त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रतिमेवरही परिणाम होत असून, हा कायदा मुस्लीमविरोधी म्हणूनही प्रक्षेपित केला जात आहे.

अशा परिस्थितीत मुस्लीम जगतातील एक उदारमतवादी नेता जेव्हा भारतात येतो आणि सर्व नेत्यांची भेट घेतो तेव्हा सरकारला देशातील मुस्लिमांना मोठा संदेश द्यायचा असतो. अल-इसा आपल्या भेटीदरम्यान UCC, भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर काही भाष्य करतात की नाही हे देखील पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT