Murshidabad Medical College 10 Children Died Dainik Gomantak
देश

West Bengal: पश्चिम बंगाल हादरलं! मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये 10 अर्भकांचा मृत्यू

Murshidabad Medical College 10 Children Died: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये एकामागून एक 10 अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Manish Jadhav

Murshidabad Medical College 10 Children Died: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये एकामागून एक 10 अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यापैकी 9 नवजात बालके होती. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दोन-तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जंगीपूर, मुर्शिदाबादच्या एसएनसीयू विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काहीही समजण्याआधी, मृत्यूची संख्या वाढतच गेली आणि एका दिवसात 9 पर्यंत संख्या वाढली. तेव्हापासून शुक्रवार दुपारपर्यंत इथे 10 बालकांना जीव गमवावा लागला असून त्यापैकी 9 नवजात बालके असून एक 2 वर्षाचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. या हृदयद्रावक घटनेच्या चौकशीसाठी सध्या एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीला श्वसनाचा त्रास आणि कुपोषण हे मृत्यूच्या मागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

मृत बालकांचे वजन 300 ते 500 ग्रॅम इतके होते

दरम्यान, या परिस्थितीनंतर संपूर्ण रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयात त्या नवजात बालकांची प्रकृती अचानक कशी बिघडली हा तपासाचा विषय आहे. त्यांचा मृत्यू कसा काय झाला? आतापर्यंत या प्रश्नांची ठोस उत्तरे मिळालेली नाहीत, मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्व नवजात बालके गर्भातच कुपोषणाला बळी पडली होती. त्यांचे वजन 300 ते 500 ग्रॅम होते. हे मृत्यूचे कारण असू शकते. दुसरीकडे, रुग्णालयाबाबत आणखी एक विशेष बाब नमूद करणे आवश्यक आहे की, SNCU विभागाकडे केवळ 52 नवजात बालकांना दाखल करण्याची क्षमता आहे, तर सध्या इथे दाखल झालेल्या बालकांची संख्या 250 होती. प्रत्येक बेडवर तीन अर्भके असल्याने प्रकृती बिघडण्याची शक्यता बळावली आहे.

मृत्यूच्या कारणावर तज्ज्ञांनी ही माहिती दिली

याबाबत मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मुर्शिदाबादच्या सर्वच निमसरकारी रुग्णालयांची अवस्थाही अत्यंत वाईट आहे, तिथे व्हेंटिलेटर नसल्याने नवजात बालकांना इथे (मेडिकल कॉलेजमध्ये) आणले जात आहे. मात्र, केवळ इथेच असे नाही, तर इतर रुग्णालयांमध्येही बाळांचे वजन 300 ते 500 ग्रॅम यादरम्यानचअसून ही चिंतेची बाब आहे. प्रोफेसर अमित दान यांनी सांगितले की, सात मुलांना अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. दोन अर्भकांचा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोममुळे मृत्यू झाला. त्यातील एकाचे वजन खूपच कमी असल्याने त्याला वाचवता आले नाही. दोघांचा मृत्यू सेप्टिसिमियामुळे तर एकाचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू झाला. दहावीचा मुलगा न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसऑर्डरचा शिकार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT