Crime  Dainik Gomantak
देश

Bihar Dalit Leader Murdered: बिहारमध्ये दलित नेत्याची निर्घुण हत्या, आंबेडकर जयंतीच्या दिवशी...

Bihar Dalit Leader Murder: दलित सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राकेश पासवान यांच्या हत्येच्या एका दिवसानंतर म्हणजेच आज बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली.

Manish Jadhav

Bihar Dalit Leader Murdered: दलित सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राकेश पासवान यांच्या हत्येच्या एका दिवसानंतर म्हणजेच आज बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली.

दलित नेते राकेश पासवान यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ आज आंबेडकर जयंतीच्या दिवशी पासवान यांच्या समर्थकांनी जाळपोळ आणि तोडफोड केली.

दरम्यान, गुरुवारी दलित नेते राकेश पासवान यांची वैशाली जिल्ह्यातील लालगंज येथील घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

राकेश भारत नौजवान सभा नावाची संघटना चालवायचे. परिसरातील दलितांच्या बड्या नेत्यांपैकी ते एक होते.

दुसरीकडे, गुरुवारी राकेश पासवान आपल्या समर्थकांसह आंबेडकर जयंतीच्या तयारीत गुंतले होते.

दरम्यान, सायंकाळी उशिरा पासवान यांच्या घरी पोहोचलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, चार गुन्हेगार राकेश पासवान यांच्या घरी पोहोचले होते. त्यांनी पासवान यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला, त्यानंतर अचानक चौघांनी त्यांना गोळ्या घातल्या.

राकेश यांचा जागीच मृत्यू झाला

या घटनेत राकेश पासवान यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतर राकेश यांचे कुटुंबीय आणि समर्थक राकेश यांना घेऊन तातडीने हाजीपूर सदर रुग्णालयात (Hospital) पोहोचले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुसरीकडे, हत्येचे वृत्त कळताच पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसल्याने रुग्णालयाचे छावणीत रुपांतर झाले.

त्याचवेळी, डॉक्टरांनी राकेश पासवान यांच्या मृत्यूची पुष्टी केल्याने पासवान यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी रुग्णालयात गोंधळ सुरु केला. समर्थकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.

हत्येनंतर पोलिसांना (Police) मृतदेहाचे पोस्टमार्टम करायचे होते, मात्र समर्थकांनी राकेश पासवान यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील एसपी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरावर लक्ष ठेवून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT