Dimple Yadav Dainik Gomantak
देश

Mainpuri ByPoll Election Result: मुलायमसिंह यादव यांच्या सुनेने रचला इतिहास

पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारावर 2.88 लाख मतांनी विजय

Akshay Nirmale

Mainpuri ByPoll Election Result: गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसह देशभरात 5 राज्यातील 6 विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका झाल्या. यात देशाचे लक्ष लागले होते ते उत्तर प्रदेशातील मैनपुरी या मतदारसंघाकडे. या मतदारसंघातून उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत नेते मुलायमसिंह यादव यांच्या स्नुषा आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव (Dimple Yadav) यांनी विजय मिळवला आहे.

मैनपुरी येथील डिंपल यादव यांचा हा विजय ऐतिहासिक आहे. त्यांनी 2 लाख 88 हजार 136 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या रघुराज शाक्य यांना पराभूत केले. एकप्रकारे मैनपुरीवासियांनी मुलायमसिंह यादव यांचा येथील राजकीय वारसा त्यांची सून डिंपल यांच्याकडे सोपवला आहे.

समाजवादी पक्षाकडून लढताना डिंपल यादव यांनी 6 लाख 17 हजार 625 मते घेतली आहेत, तर रघुराज शाक्य यांना 3 लाख 29 हजार 489 मते मिळाली. 1996 मध्ये मुलायमसिंह यादव यांनी मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत मैनपुरी हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला बनला आहे. त्यानंतरपासून येथे समाजवादी पक्षाचा पराभव झालेला नाही.

5 डिसेंबर रोजी येथे मतदान झाले होते. डिंपल यादव या यापुर्वी उत्तरप्रदेशातील कन्नौज येथून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. डिंपल या 2009 मध्ये फिरोजाबाद येथे राज बब्बर यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. तर 2012 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना बिनविरोध निवडून देण्यात आले होते.

डिंपल यांचा जन्म 1978 में पुणे (महाराष्ट्र) येथे झाला. त्यांचे वडील कर्नल आर. एस. रावत (निवृत्त) आणि आईचे नाव चंपा रावत असे आहे. डिंपल यांचे कुटूंब मूळचे उत्तराखंडचे आहे. त्यांचे शिक्षण पुणे, भटिंडा, अंदमान-निकोबार बेट आणि आर्मी पब्लिक स्कूल लखनौ येथे झाले आहे. अखिलेश यादव यांच्याशी 1999 मध्ये त्यांचा विवाह झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT