Mukesh Ambani Dainik Gomantak
देश

Mukesh Ambani Threatened: उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचा मेल; "आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर"

20 कोटी रुपये न दिल्यास जीव गमवावा लागेल अशी धमकी ईमेलद्वारे देण्यात आली

Rajat Sawant

Mukesh Ambani Threatened: उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 20 कोटी रुपये न दिल्यास जीव गमवावा लागेल अशी धमकी ईमेलद्वारे त्यांना देण्यात आली. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिध्द केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल आला होता.

धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये लिहिले होते की, “तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला ठार मारू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत.”

मुकेश अंबानी यांना धमकीचा मेल मिळाल्यानंंतर अंबानी यांच्या सिक्योरिटी इन्चार्जने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबईच्या गावदेवी पोलिसांत आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुकेश अंबानींना जीवे मारण्याच्या धमक्या आणि खंडणीच्या धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मुंबईतील अंबानींच्या ‘अँटिलिया’ या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली होती. त्यात सुमारे 20 जिलेटिनच्या काड्या व मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना धमकी देणारे पत्र सापडले होते.

फेब्रुवारी महिन्यात एका व्यक्तीने नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुकेश अंबानी यांचे ‘अँटिलिया’ घर ब्लास्टमध्ये उडवून देण्याची धमकी दिली होती. यानंतर लगेचच पोलिसांनी अँटिलियाची सुरक्षा आणखी कडक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

कोरोना व्हायरस करु शकतो कॅन्सरग्रस्त रुग्णांचा इलाज? नव्या अभ्यासाने डॉक्टरही चकित; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT