Crime News Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh: आदिवासी अल्पवयीन मुलीला व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करायचा 'आफताब'

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशात एका आदिवासी अल्पवयीन मुलीला दुसऱ्या धर्मातील तरुणाने ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशात एका आदिवासी अल्पवयीन मुलीला दुसऱ्या धर्मातील तरुणाने ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आली आहे. एका विशिष्ट धर्मातील तरुण पीडितेचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तरुणावर आधी अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा, नंतर अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.

पोलिस (Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीने धार जिल्ह्यातील कुक्षी पोलिस स्टेशन परिसरात 'आफताब' (नाव बदलले आहे) विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी 'आफताब' विरुद्ध कलम-354 डी, 509, आयपीसी 7/8 पास्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत.

तसेच, निसारपूर चौकी परिसरात राहणारी 17 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलगी निसारपूर येथे रोजंदारीवर काम करण्यासाठी जात असे. दरम्यान, तिची 'आफताब' शी (नाव बदलले आहे) मैत्री झाली. यादरम्यान 'आफताब'ने अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा अश्लील व्हिडिओ बनवला. या फुटेजच्या आधारे आरोपीने पीडितेला धमकावून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपीच्या (Accused) कृत्याने व्यथित झालेल्या अल्पवयीन मुलीने सगळा घटनाक्रम आपल्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर नातेवाइकांनी निसारपूर चौकी गाठून तक्रार दाखल केली.

तसेच, अल्पवयीन पीडितेने पोलिसांना सांगितले की, 'आरोपी फोनवर धमकी देत ​​असे की, जर मी त्याच्याशी बोलले नाही तर तो फोटो व्हायरल करेल.' आरोपीवर नाराज होऊन पीडितेने फोन, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर त्याचा नंबर ब्लॉक केला. नंबर ब्लॉक केल्यानंतर आरोपीने 19 डिसेंबर रोजी पीडितेच्या नवऱ्याला अश्लील फोटो पाठवले. नवऱ्याला फोटो मिळाल्यानंतर नातेवाइकांनी पीडितेकडून संपूर्ण प्रकरण समजून घेत निसारपूर पोलिस चौकी गाठून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सुरक्षेची विनंती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT