Crime News Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Crime: आजाराचं सोंग, काळी जादू अन् अनैतिक संबंध...पतीने पत्नीसह शेजाऱ्याला संपवलं

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील निवाडी येथे दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील निवाडी येथे दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना समोर आली आहे. निवाडी जिल्हा मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कैना गावात सोमवारी एका 35 वर्षीय व्यक्तीने प्रेमसंबंधाच्या संशयावरुन पत्नी आणि शेजाऱ्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली.

निवाडीचे पोलीस अधीक्षक अंकित जयस्वाल यांनी सांगितले की, आरोपी (Accused) रामगोपाल कुशवाह याने आपली पत्नी अनिता (30) आणि शेजारी घनश्याम रायकवार (35) यांना त्याच्या घरी आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि रागाच्या भरात त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले.

दुसरीकडे, घनश्याम रायकवार हा कथितपणे जादूटोणा आणि भूतबाधा करत असल्याचे त्याने सांगितले. त्याने सांगितले की, अनिता शेजारी असलेल्या घनश्यामला आपल्या घरी बोलवत असे आणि आजारी असल्याचे सांगून स्वत:वर काळी जादू करत असे.

अधिकाऱ्याने सांगितले की, अनिताचा पती रामगोपाल कुशवाह याला त्याची पत्नी आणि शेजारी घनश्याम यांच्यात अनेक दिवसांपासून अवैध संबंध असल्याचा संशय होता. त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सोमवारी त्याने कामावर जाण्याचे खोटे नाटक केले आणि घराजवळ लपला. त्याचवेळी, त्याने घनश्यामला त्याच्या घरात जाताना पाहिले.

दरम्यान, रामगोपालने काही वेळाने घरामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी, दोघांना त्याने आक्षेपार्ह अवस्थेत पकडले, असे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर रागाच्या भरात त्याने जवळच पडलेल्या कुऱ्हाडीने दोघांवर वार करुन दोघांचा जागीच खून केला.

त्यांनी पुढे सांगितले की, कुशवाह याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT