Madhya Pradesh Crime: सीधीनंतर रीवामध्ये दलित तरुणाला मारहाण, चपलांचा हार घालून काढली धिंड

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात सध्या दलित आणि आदिवासींवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
Madhya Pradesh Crime
Madhya Pradesh CrimeDainik Gomantak

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात सध्या दलित आणि आदिवासींवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. सिधी येथे एका आदिवासी तरुणावर लघुशंका केल्याचे प्रकरण देशात चर्चेत असतानाच आता रिवा येथे एका दलित तरुणाला बेदम मारहाण करुन चपलांचा हार घालून धिंड काढल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, रीवा जिल्ह्यात एका दलित तरुणाला मारहाण केल्यानंतर चपलांचा हार घालून धिंड काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सुमारे 1 आठवड्यापूर्वीची आहे. गोविंदगड पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला मारहाण झाल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर तरुणाची हिंमत वाढली आणि त्याने आपली व्यथा सांगितली.

Madhya Pradesh Crime
Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात माणुसकीला काळीमा! मद्यधुंद व्यक्तीची आदिवासी तरुणाच्या डोक्यावर लघुशंका

संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

दरम्यान, हे प्रकरण रीवा जिल्ह्यातील सोहागी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगटीरा येथील आहे. जहाँ येथील रहिवासी असलेल्या इंद्रजित मांझी नावाच्या तरुणाला अमानुषरित्या मारहाण करण्यात आली.

मारहाणीनंतर गळ्यात चपलांचा हार घालून गावात धिंड काढण्यात आली. यासोबतच तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याला आरोपीकडून (Accused) देण्यात आली होती. मात्र आरोपींवर नुकत्याच झालेल्या कारवाईमुळे पीडितेला बळ मिळाले आणि त्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Madhya Pradesh Crime
Madhya Pradesh Crime: मुस्लिम मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरुन हिंदू तरुणाची हत्या, खळबळजनक घटनेने उडाला थरकाप!

पीडित व्यक्तीच्या अंगावर जखमा

सोहागी पोलीस स्टेशन परिसरात राहणारे हरिओम सिंह, रिंकू सिंह आणि देशपाल सिंह यांनी अमानुष कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींमध्ये देशपाल सिंह आणि हरिओम सिंह पिता-पुत्राचा समावेश आहे. ज्यांच्याकडून इंद्रजित मांझी यांच्यासोबत अमानवी कृत्य करण्यात आले आहे.

इंद्रजितच्या अंगावर गंभीर जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी देण्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रीवा जिल्ह्यात अमानवी कृत्य केल्यानंतर व्हिडिओ बनवण्याचे प्रकार समोर येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com