ALH Mk-III स्वदेशी तटरक्षक कार्यक्रमाला चालना देण्यासाठी, HAL ने बनवलेली तीन प्रगत हलकी हेलिकॉप्टर ALH Mk-III भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार (Dr. Ajay Kumar) यांच्या उपस्थितीत ही हेलिकॉप्टर्स आज तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली आहेत.
यापूर्वी 13 जून रोजी तीन Mk-IIIs भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले होते. माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव कार्यात मदत करतात, ते किनारपट्टी सुरक्षेसाठी प्रभावी आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, ही हेलिकॉप्टर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केली आहेत, आणि 2022 च्या मध्यापर्यंत अशी 16 हेलिकॉप्टर तटरक्षक दलाला पुरवली जातील. ही हेलिकॉप्टर भुवनेश्वर, पोरबंदर, कोची आणि चेन्नई येथे तटरक्षक दलाच्या चार तुकड्यांमध्ये तैनात केली जातील.
ALH Mk-3 हेलिकॉप्टर सर्व प्रकारच्या हवामानात वापरता येते. बहुआयामी भूमिका असलेले हे एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. यात एक अत्याधुनिक ग्लास कॉकपिट आणि शक्तिशाली शक्ती इंजिन लावण्यात आले आहे . या हेलिकॉप्टरचे अनेक फायदे आहेत. ही हेलिकॉप्टर पाळत ठेवणारे रडार, इलेक्ट्रो ऑप्टिक पॉड, मेडिकल केअर युनिट, हाय इंटेंसिटी लाइट, एसएआर होमर सिस्टम, मशीन गन सारख्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये प्रगत सेन्सर्सच्या मदतीने तटरक्षक दल आव्हानात्मक कामे करू शकणार आहे.
गुजरातमध्ये लहान विमाने आणि हेलिकॉप्टरचे उत्पादन सुरु होईल
यापूर्वी एक बातमी आली होती की, केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया (Make in India) या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत देशात प्रथमच गुजरातमध्ये लहान विमाने आणि हेलिकॉप्टरचे उत्पादन सुरू केले जाईल. राज्याच्या नागरी उड्डयन विभागाने खाजगी कंपनी एरो फ्रीयर इंक सह सामंजस्य करार केला आहे. कंपनीने अमरेली एअर स्ट्रिपजवळ उत्पादन युनिट सुरू करण्याचे काम सुरू केले आहे. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत हे युनिट कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. कंपनीचे पहिले विमान 2021 च्या अखेरीस बाजारात येऊ शकते. यासाठी कंपनी पहिल्या टप्प्यात 150 कोटी आणि त्यानंतर 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.