नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने (The Ministry of Civil Aviation) देशांतर्गत विमान भाड्याचा (Domestic air fares) कमाल आणि किमान मर्यादेचा हिस्सा साडेबारा टक्क्याने वाढविला आहे. मंत्रालयाने भाड्यावरील अप्पर ची मर्यादा 12.82% टक्क्यांपर्यंत वाढवल्यामुळे आंतरदेशीय विमानप्रवास (Domestic Air Travels ) महागला आहे. त्यामुळे विमान प्रवाश्यांच्या (Air Traveler) खिशाला कैची लागणार आहे. (Air Travel)
कोरोनाव्हायरस मुळे गेल्या वर्षी दोन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर मे महिन्याच्या शेवटी विमानसेवा सुरू झाली होती. तेव्हा शासनाने देशांतर्गत विमान भाड्यावर लोअर आणि अप्पर ची मर्यादा ठेवली होती. आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि एअरलाईन्स कंपन्या अधिक क्षमतेने उड्डाणे घेत आहेत, ग्राहकांची देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी वाढू लागल्याने विमान कंपन्यांना अधिक क्षमतेने उड्डाण करण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या कंपन्यांची उड्डाण क्षमता साडेबाहात्तर टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे विमानांच्या तिकीट भाड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.