हवामान विभागाकडून दिल्ली-एनसीआर, हरियाणा, यूपी, पंजाबसह डोंगराळ भागात सातत्याने पावसाचा इशारा दिला आहे.  Dainik Gomantak
देश

Monsoon: दिल्लीला 'ऑरेंज अलर्ट' तर मध्य प्रदेशात पुढील 5 दिवस मुसळधार

दुसरीकडे पंजाब, हरियाणा-यूपीमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. डोंगराळ राज्यात उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: देशातील बहुतेक राज्यांमध्ये मुसळधार (Heavy rains in most parts of the country) पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली (A flood situation ensued) आहे. पण उत्तर भारतात पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु हवामान विभागाकडून दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR), हरियाणा, यूपी, पंजाबसह डोंगराळ भागात सातत्याने पावसाचा इशारा दिला आहे. आजही दिल्ली-एनसीआरमध्ये ढगाळ वातावरण असून, राजधानीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून दिल्लीसाठी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे पंजाब, हरियाणा-यूपीमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. डोंगराळ राज्यात उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तर झारखंडमध्ये देखील अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशात सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील पाच दिवसा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे. हवामान विभागाने सांगितले आहे की, वायव्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. एवढेच नाही तर मान्सून ट्रफ गंगानगर, नारनौल, वायव्य मध्य प्रदेश क्षेत्राच्या मध्यभागी जात आहे. आणि वाराणसी, गया, बांकुरासह ईशान्य बंगालच्या उपसागराच्या दिशेने दक्षिण -पूर्व दिशेने सरकत आहे. यामुळे पुढील पाच दिवस मध्य प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राजस्थानच्या पूर्व भागातही पावसाचा इशारा

पूर्व राजस्थानमध्ये विविध भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. स्कायमेटने दिलेलल्या माहितीनुसार, पूर्व राजस्थानमध्ये सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाण्याची पातळीही वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT