मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात 95 ते 105 टक्के पावसाचा अंदाज

कोकण, घाटमाथ्यावर पुन्हा जास्त पावसाचा अंदाज असल्याने आधीच वादळ, पूर, दरडी कोसळणे यामुळे कोकणातील लोकांचे भरपूर नुकसान झाले आहे. त्यात आता हवामान विभागाने वर्तविलेल्या या अंदाजामुळे सतर्क राहण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टप्प्यात साधारणत: 95 ते 105 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्यात साधारणत: 95 ते 105 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.dainik gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: नैऋत्य मोसमी वारे अर्थाट मॉन्सूनने (Monsoon) जून-जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यात चांगली बॅटींग केले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात (In the second phase) म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मॉन्सून कसा असेल याबाबत भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात साधारणत: 95 ते 105 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

यामध्ये ऑगस्ट महिन्यात 94 ते 106 टक्के पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली आहे. महापात्रा म्हणाले, मॉन्सूनचा दुसरा हंगामात म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये 428.3 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात 95 ते 105 टक्के पाऊस असेल असा अंदाज आहे.

दुसऱ्या टप्प्यात साधारणत: 95 ते 105 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
''मॉन्सून म्हणजे पाऊस नव्हे'' 

देशात ऑगस्टमध्ये सर्वसाधारण म्हणजे 94 ते 106 टक्के पावसाची शक्यता आहे. 1961 ते 2010 या कालावधीत ऑगस्ट महिन्यात दीर्घकालीन सरासरी 258.1 मिलीमीटर आहे. ऑगस्टमध्ये मध्य व वायव्य भारतात सरासरी किंवा त्यापेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. ईशान्य व मध्य भारतात सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यात साधारणत: 95 ते 105 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
Monsoon Update: कोकणात उद्या पावसाची शक्यता, मात्र उर्वरीत भागात विश्रांती

ऑगस्ट महिना महाराष्ट्रासाठी काळजीचा

जून-जुलैच्या मॉन्सूनचा विचार करता महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात कोकण, घाटमाथ्यावर पुन्हा जास्त पावसाचा अंदाज असल्याने आधीच वादळ, पूर, दरडी कोसळणे यामुळे कोकणातील लोकांचे भरपूर नुकसान झाले आहे. त्यात आता हवामान विभागाने वर्तविलेल्या या अंदाजामुळे कोकणातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने आता पुन्हा एकदा कोकणावर संकट येऊ नये ही प्रार्थना नक्कीच आहे. कोकणाव्यतीरिक्त राज्याच्या इतर भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. राज्यात सध्या पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली असून, उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही. त्यात आता ऑगस्टमध्ये या भागात पाऊस कमी असल्याने चिंतेत भर पडली आहे.

दुसऱ्या टप्प्यात साधारणत: 95 ते 105 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
चुकीला माफी नाही; संजय राऊतांचा BJP ला इशारा

एल निनोची सद्य स्थिती प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागावर सरर्वसाधारण आहे. ती मॉन्सून संपेपर्यंत अशीत राहील. विषुवृत्तीय प्रशांत महासागरातील पूर्व व मध्यम भागातील समुद्र थंड होत आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबीसमुद्रातील तापमानाचा मॉन्सूनवर फरक पडतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com