Mohammed Siraj @zeeshan_naiyer2
देश

Mohammed Siraj: 'मिया मॅजिक'चा जलवा! विराटच्या पठ्ठ्यानं दिग्गजांना मागं सोडत जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार

Mohammed Siraj Wins ICC Award: आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु असताना एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Mohammed Siraj Wins ICC Award: आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु असताना एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑगस्ट महिन्यासाठीचा 'आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ' (ICC Men's Player Of The Month) पुरस्कार जिंकला. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीचा इनाम त्याला या प्रतिष्ठीत पुरस्काराने मिळाला.

इंग्लंडमध्ये 'सिराज'चे वादळ

दरम्यान, मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत अविश्वसनीय गोलंदाजी केली. त्याने आपल्या भेदक माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांची पळताभुई थोडी केली. सिराजने या मालिकेत दोन वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी (5-Wicket Haul) केली. संपूर्ण मालिकेत तो भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

त्याने मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियासाठी (Team India) 'वन-मॅन आर्मी' ची भूमिका बजावली. त्याच्या धमाकेदार कामगिरीमुळेच भारताने तो सामना जिंकला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. सिराजने सलग 5 कसोटी सामने खेळून आपल्या उत्कृष्ट फिटनेसचेही प्रदर्शन केले, जे कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी एक मोठे आव्हान असते.

सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज

इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत मोहम्मद सिराजने 9 डावांमध्ये 32.43 च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या, ज्या मालिकेत सर्वाधिक होत्या. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला ऑगस्ट महिन्याच्या 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी निवडण्यात आले. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा शुभमन गिल 754 धावांसह पहिल्या क्रमांकावर होता, तर इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट 537 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. तसेच, गोलंदाजांमध्ये सिराजनंतर इंग्लंडचा जॉश यंग 19 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर होता.

आयसीसीने ऑगस्ट महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ'साठी तीन खेळाडूंची नावे नामांकित केली होती. यात मोहम्मद सिराजच्या नावाव्यतिरिक्त न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री आणि वेस्ट इंडीजचा युवा गोलंदाज जेडन सिल्स यांचा समावेश होता.

मॅट हेन्रीने झिम्बाब्वेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत 16 विकेट्स घेतल्या होत्या, तर जेडन सिल्सने ऑगस्ट महिन्यात 10 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंच्या तुलनेत सिराजची कामगिरी अधिक प्रभावशाली ठरली, ज्यामुळे त्याला हा पुरस्कार मिळाला.

दरम्यान, सिराजचा हा पुरस्कार त्याच्या मेहनतीचे आणि प्रतिभेचे फळ आहे. सध्या तो आशिया कपमध्ये खेळत नसला तरी, त्याच्या या कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याने त्याचे मनोधैर्य नक्कीच वाढेल. भारतीय चाहते त्याला लवकरच मैदानावर पुन्हा भेदक गोलंदाजी करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

SCROLL FOR NEXT