Mohammed Siraj Dainik Gomantak
देश

Mohammed Siraj: मिया भाईची 'मायसेल्फ' स्टोरी...! ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया; 'त्या' आठवणीने झाला भावूक VIDEO

Mohammed Siraj Emotional: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात टीम इंडियाचा जलवा पाहायला मिळाला.

Manish Jadhav

Mohammed Siraj Emotional: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात टीम इंडियाचा जलवा पाहायला मिळाला. ओव्हल कसोटीत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज विजयानंतर चांगलाच भावूक झाला. दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेत त्याने भारताला थरारक विजय मिळवून दिला. विजयानंतर त्याने दिनेश कार्तिकशी (Dinesh Karthik) संवाद साधला. त्यावेळी त्याला रवींद्र जडेजाने सांगितलेल्या एका गोष्टीची आठवण झाली, ज्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.

सिराज झाला भावूक

दरम्यान, विजय मिळवल्यानंतर सिराजने चेंडू घेऊन स्टेडियममध्ये (Stadium) फेरी मारली. त्यावेळी चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. हा क्षण त्याच्यासाठी खूप खास ठरला. त्याला आठवले की, लॉर्ड्स कसोटीत रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) त्याला त्याच्या दिवंगत वडिलांना आठवण्यास सांगितले होते. 'लॉर्ड्समध्ये मी विकेट वाचवू शकलो नाही, पण ओव्हलमध्ये मी तो पराक्रम करुन दाखवला', असे सांगताना तो भावूक झाला.

सिराजचा विजयाचा खास 'प्लॅन'

सिराजच्या कामगिरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्वतःवर असलेला विश्वास. “मी फक्त एकाच टप्प्यावर गोलंदाजी (Bowling) करणार होतो. वारंवार बदल करण्याची गरज नव्हती, फक्त एकाच टप्प्यावरुन चेंडू आत आणि बाहेर नेण्याचा माझा प्लॅन होता,” असे त्याने सांगितले. एवढचं नाहीतर त्याने एका व्हायरल व्हिडिओतील “आय बिलीव्ह ऑन जस्सी भाई” (I believe on Jassi Bhai) हा डायलॉग बदलून “आय बिलीव्ह ऑन मायसेल्फ” (I believe on myself) असे म्हटले. या विजयासाठी तो स्वतःवर विश्वास ठेवून होता, असेही त्याने पुढे सांगितले.

हॅरी ब्रूकच्या सुटलेल्या कॅचची खंत

सिराजने मान्य केले की चौथ्या दिवशी जर त्याने हॅरी ब्रूकचा (Harry Brook) झेल (Catch) पकडला असता, तर सामना पाचव्या दिवसापर्यंत (Fifth Day) गेला नसता. “तो झेल सुटल्याने खूप नुकसान झाले, पण शेवटी आम्ही जिंकलो, हे महत्त्वाचे आहे,” असेही तो सांगायला विसरला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

SCROLL FOR NEXT