Mohammed Siraj: "चल बाहेर!" बेन डकेटला बाद करताच सिराजचा आक्रमक अवतार, दिला धक्का; पाहा व्हिडिओ

IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला मोहम्मद सिराजने इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला बाद केले, त्यानंतर सिराजचं हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mohammed Siraj Celebration
Mohammed Siraj CelebrationDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Engaland 3rd Test Lords

भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळला जाणारा तिसरा कसोटी सामना खूपच रोमांचक होत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या ६ मिनिटांत जॅक क्रॉली वेळ वाया घालवत असताना एक जबरदस्त नाट्यमय खेळ पाहायला मिळाला. त्यानंतर आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) बेन डकेटला बाद केले. यानंतर मोहम्मद सिराजचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

लॉट्स टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला, इंग्लंडने सलामीवीर बेन डकेटच्या रूपात २२ धावांवर पहिली विकेट गमावली. मोहम्मद सिराजने डकेटला जसप्रीत बुमराहने झेलबाद केले, त्यानंतर सिराज खूप आक्रमकपणे सेलिब्रेशन करताना दिसला.

तो डकेटच्या अगदी जवळ गेला आणि ओरडून सेलिब्रेशन केले. यादरम्यान सिराजच्या खांद्यावरही डकेटला मार लागला, त्यानंतर पंचांनी जाऊन सिराजशी बोलले. सिराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Mohammed Siraj Celebration
Goa Beaches: गोवा किनारी क्षेत्राबाबत नवी अपडेट! व्यवस्थापन आराखडा डिसेंबरमध्ये; मच्छीमार वस्तीमध्ये साकारणार पर्यटन प्रकल्प

लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३८७ धावा केल्या. इंग्लंडकडून जो रूटने शतक झळकावले. प्रत्युत्तरादाखल भारताचा पहिला डावही ३८७ धावांवर संपला. टीम इंडियाकडून केएल राहुलने शतक झळकावले.

तर ऋषभ पंतने ७४ धावा आणि रवींद्र जडेजाने ७२ धावांचे योगदान दिले. आता इंग्लंडने २२ धावांवर पहिली विकेट गमावली. डकेट फक्त १२ धावा करून बाद झाला. आता टीम इंडिया इंग्लंडचा दुसरा डाव किती धावांनी गुंडाळते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com