Mohammed Siraj Record
Mohammed Siraj RecordDainik Gomantak

Mohammed Siraj Record: सिराजने मोडला बुमराहचा विक्रम! 29 वर्षांनंतर 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू

IND VS ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे.
Published on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्या डावात चार बळी घेतले. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात त्याने सहावेळा चार बळी घेतले आहेत. यासह, त्याने इंग्लंडमधील कसोटी सामन्यात चार बळी घेण्याच्या बाबतीत जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे.

जसप्रीत बुमराहने इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या एका डावात पाच वेळा चार बळी घेतले आहेत. सिराजने ही कामगिरी सहा वेळा केली आहे. आता तो बुमराहला मागे टाकत आहे. आशियाई गोलंदाज म्हणून, सिराजने इंग्लंडमध्ये सर्वाधिक चार बळी घेण्याच्या बाबतीत मुथय्या मुरलीधरन आणि वकार युनूस यांच्याशी बरोबरी केली आहे. या दोन्ही माजी गोलंदाजांनी इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सहा वेळा चार बळी घेतले आहेत. १९९६ मध्ये वकार युनूसने ह कामगिरी केली होती.

Mohammed Siraj Record
Goa Assembly Monsoon Session: विधानसभेत घुमला खाणपट्ट्यातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्‍यांचा आवाज, 'सांडूर-बेल्‍लारी'चे दाखले, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

इंग्लंडमध्ये एका डावात ४ बळी घेणारे सर्वाधिक आशियाई गोलंदाज

मोहम्मद सिराज: ६

वकार युनूस: ६

जसप्रीत बुमराह: ५

मोहम्मद आमिर: ५

यासिर शाह: ५

Mohammed Siraj Record
Goa Assembly: 'किनारी भागात भटकी कुत्री, जनावरांवर निर्बंध आणा', जीत आरोलकरांची मागणी

वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटी सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या अनुपस्थितीत, सिराजने या सामन्याच्या पहिल्या डावात ४ बळी घेतले. आकडेवारीवरून असे दिसून येते की जेव्हा जेव्हा जसप्रीत बुमराह सामन्याबाहेर राहिला आहे तेव्हा सिराजने पुढे येऊन संघाला यश मिळवून दिले आहे.

बुमराहच्या उपस्थितीत, सिराजने ४७ कसोटी डावांमध्ये ७४ बळी घेतले आहेत. या दरम्यान, त्याची सरासरी ३५ आहे. दुसरीकडे, बुमराहच्या अनुपस्थितीत, सिराजने २८ डावांमध्ये ४४ बळी घेतले आहेत. त्याची सरासरी २५.६ आहे. यापूर्वी, बुमराह इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळला नव्हता, तिथेही सिराजने दोन्ही डावांमध्ये एकत्रितपणे ७ बळी घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com