Modi Needs a Reminder That He Speaks At Red Fort as PM and Not as a BJP Pracharak. Dainik Gomantak
देश

Independence Day: "त्यांना कोणीतरी सांगा, लाल किल्ल्यावरून ते पंतप्रधान म्हणून बोलतात, भाजप प्रचारक म्हणून नाही”

Ashutosh Masgaunde

Modi Needs a Reminder That He Speaks At Red Fort as Prime Minister and Not as a BJP Pracharak:

लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर "घराणेशाही" बद्दल केलेल्या हल्ल्याला अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

राज्यसभेतील तृणमुल कॉंग्रेस (Trinamool Congress) खासदार साकेत गोखले (Saket Gokhale) यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केलेल्या टीकेवर टोला लगावला.

"मला पंतप्रधान मोदींची लाज वाटते, त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) भाषणाचा वापर विरोधकांवर टीका करण्यासाठी केला.

आजचा दिवस हा उत्सव साजरा करण्याचा आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांच्या स्मरणाचा आहे. मोदींना आठवण करून देण्याची गरज आहे की ते लाल किल्ल्यावर पंतप्रधान म्हणून बोलतात, भाजप प्रचारक म्हणून नाही," असे साकेत गोखले यांनी ट्विटर लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात घराणेशाही (Nepotism), राजकीय पक्षांना भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणासह भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, असे घराणेशाही राजकीय पक्ष एकाच तत्त्वावर काम करतात आणि ते म्हणजे, "कुटुंबाने कुटुंबासाठी चालवलेला पक्ष."

पंतप्रधानांनी अशा पक्षांना भारताच्या लोकशाहीसमोरील सर्वात मोठा अडथळा म्हटले. तसेच या पक्षांना संपवण्याचे लोकांना आवाहन केले.

पंतप्रधान म्हणाले की, घराणेशाही राजकीय पक्ष प्रतिभा आणि क्षमता वाढू देत नाहीत आणि त्यामुळे लोकशाहीचे नुकसान होत आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून (Red Fort) १०व्यांदा देशाला संबोधित केले.

भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ईशान्येकडील, विशेषत: मणिपूरमधील हिंसाचारामुळे (Manipur Violence) अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, माता आणि मुलींच्या सन्मानाशी खेळले गेले. मात्र काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहेत.

यावर तोडगा शांततेनेच शोधला जाऊ शकतो. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) लाल किल्ल्यावरून हे त्यांचे शेवटचे भाषण आहे. 'पुढच्या वेळी १५ ऑगस्टला या लाल किल्ल्यावरून मी देशाची प्रगती आणि विकास तुमच्यासमोर मांडेन', असे मोदीं आपल्या भाषणात म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT