Independence Day 2023: अंतराळापासून UPI पर्यंत भारताची जगभरात छाप

Independence Day 2023: अंतराळ, तंत्रज्ञान, लष्करी आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रात भारताचे कार्य आणि यश केवळ देशातच नव्हे तर जागतिक स्तरावरही उपयुक्त ठरत आहे.
Indias Achievements in Space, Technology, Military Are Proving Useful Globally.
Indias Achievements in Space, Technology, Military Are Proving Useful Globally.Dainik Gomantak
Published on
Updated on

Indias Achievements in Space, Technology, Military Are Proving Useful Globally:

अंतराळ, तंत्रज्ञान, लष्करी आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रात भारताचे कार्य आणि यश केवळ देशांतच नव्हे तर जागतिक स्तरावरही उपयुक्त ठरत आहे. यामुळे भारताची प्रतिमा एक मजबूत राष्ट्र म्हणून जगात निर्माण होत आहे.

सेमीकंडक्टर्स, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि सखोल अवकाश संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारत जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करत आहे.

याचे येत्या काही वर्षांत देशाला आनेक फायदे मिळणार असून लोकांच्या जीवनावर त्यांचे सकारात्मक परिणाम होतील.

नवीन व्यवसायांसाठी डिजिटल पायाभूत सुविधा

जून 2022 मध्ये, Google आणि इतर कंपन्यांनी भारतातील ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी, कॅब इत्यादी सारख्या इंटरनेट-आधारित सेवांवरील अहवालात दावा केला आहे की 2022 मध्ये 17,500 दशलक्ष डॉलर्सवर असलेला हा व्यवसाय 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.

भारतातील मजबूत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचे यामध्ये सर्वात मोठे योगदान आहे. नवनवीन व्यवसाय उभारण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहे.

Indias Achievements in Space, Technology, Military Are Proving Useful Globally.
Independence Day 2023: पंतप्रधान मोदींचा या 'तीन' वाईट गोष्टींशी लढण्याचा निर्धार

जगातील रिअल टाइम पेमेंट लीडर

आपल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसचा (UPI) सिंगापूर, मलेशिया, ओमान, यूएई, फ्रान्स, यूके थायलंड, फिलीपिन्स, हाँगकाँग, तैवान, दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये देखील वापर केला जात आहे. नेदरलँड, बेल्जियम, स्वित्झर्लंड देखील लवकरच यूपीआयचा वापर सुरू करणार आहेत.

Indias Achievements in Space, Technology, Military Are Proving Useful Globally.
Independence Day PM Modi Speech: 'मणिपूरमध्ये जेव्हा काही घडते तेव्हा...' जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 7 महत्वाचे मुद्दे

आकाश, सूर्य, चंद्र... सर्वत्र भारत

स्वातंत्र्यदिनाच्या सात दिवसांनी म्हणजे २३ ऑगस्ट रोजी आपले चांद्रयान ३ चंद्रावर उतरवून, आपण जगातील चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे.

सप्टेंबरमध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 मिशन पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किमी दूर पाठवले जाऊ शकते.

यानंतर, खगोलीय क्ष-किरण आणि प्रकाशाच्या स्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी देशाचे पहिले पोलरीमीटर (पोलारिमीटर) मिशन एक्सपोसॅट पाठवले जाईल.

2024 मध्ये, गगनयान मोहिमेत, 3 भारतीयांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किमी उंचीवर तीन दिवसांसाठी अंतराळात पाठवले जाईल आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले जाईल.

जिथे अमेरिका आणि चीन अंतराळ पर्यटनात आघाडीवर होण्याचा प्रयत्न करत आहेत, तिथे 2030 पर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्था 6 कोटी रुपयांमध्ये अवकाश प्रवास सुरू करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com