Modi Govt Hacking My Phone', Mahua Moitra Alleges Showing Evidence of Apple Threat Message. Dainik Gomantak
देश

'अ‍ॅपलकडून वॉर्निंग मेसेज, मोदी सरकार माझा फोन हॅक करत आहे', Mahua Moitra यांचे पुरावे दाखवत आरोप

Cash For Query: खरे तर, नुकतेच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता.

Ashutosh Masgaunde

Modi Govt Hacking My Phone', Mahua Moitra Alleges Showing Evidence of Apple Threat Message:

कॅश फॉर क्वेरी प्रकरणात ओरोपांच्या जाळ्यात अडकलेल्या टीएमसी च्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

सरकार आपला फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महुआ यांनी सांगितले की, मला APPLE कडून एक अलर्ट आणि ईमेल मिळाला की, सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.

महुआ यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस खासदार शशी थरूर, पवन खेडा आणि शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही त्यांच्या फोनवर अशा अलर्टचे मेसेज आलेले आहेत.

गृहमंत्रालयाला टॅग करत महुआ यांनी पुढे लिहिले, "अदानी आणि पीएमओचे लोक, मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मला त्यांच्याच भीतीची तुमची दया येते."

त्या पुढे म्हणाल्या, "मला, शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी, कॉंग्रेस राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि इंडिया आघाडीच्या इतर तीन नेत्यांना आतापर्यंत असे अलर्ट मिळाले आहेत. हा प्रकार आणीबाणीपेक्षा वाईट आहे. सध्या भारत हा लो लाइफ पीपिंग टॉम्सद्वारे चालवला जात आहे."

थरूर यांनाही अलर्ट

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही ट्विट केले की, त्यांनाही अ‍ॅपलकडून अलर्ट मिळाला आहे. ते म्हणाले, "माझ्यासारख्या करदात्यांच्या खर्चावर अल्परोजगार अधिकाऱ्यांना व्यस्त ठेवण्यात आनंद होतो! त्यांच्याकडे आणखी काही महत्त्वाचे काम नाही?"

काय आहे कॅश फॉर क्वेरी?

नुकतेच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता.

महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांना केले होते.

जय अनंत देहादराय यांच्याकडून मिळालेल्या पत्राचा हवाला देत निशिकांत यांनी मोईत्रा यांच्यावर हे आरोप केले आहेत. निशिकांत दुबे यांचा दावा आहे की, महुआ मोइत्रा यांनी नुकत्याच लोकसभेत विचारलेल्या ६१ प्रश्नांपैकी ५० प्रश्न अदानी प्रकरणावर केंद्रित होते.

संसदेची आचार समिती करणार चौकशी

संसदेची आचार समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे. निशिकांत दुबे आणि जय अनंत यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

आचार समितीने महुआ मोईत्रा यांना 2 रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, महुआ यांना शुक्रवारी आपल्या पत्रात ५ नोव्हेंबरनंतर आचार समितीसमोर चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

यावर समितीने म्हटले आहे की, टीएमसी खासदार महुआ यांना 2 नोव्हेंबरला आचार समितीसमोर हजर राहावे लागेल. पुढची तारीख देण्याच्या मागणीवर ते विचार करणार नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT