New Year  Dainik Gomantak
देश

New Year: मोदी सरकारने केली गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा, सर्वसामान्यांना New Year गिफ्ट..

सरकारने यामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट, ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केलीय.

गोमन्तक डिजिटल टीम

New Year 2023 Gift : नववर्षाच्या पूर्वसंध्येलामोदी सरकारने सर्वसामान्यांना न्यू ईयर गिफ्ट दिलंय. केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करत सामान्यांच्या नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार सुरुवात केली आहे. सरकारने यामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट, ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केलीय. त्यामुळे नव्या वर्षात अल्पबचत करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नवे व्याजदर हे 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

पीपीएफच्या (PPF) व्याजदरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1 जानेवारीपासून नवे व्याजदर लागू होणार आहेत. अर्थखात्याने काढलेल्या नोटिफिकेशननुसार जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी काही सेव्हिंग स्कीमवरील व्याजदर 0.20 टक्के ते 1.10 टक्के वाढवण्यात आले आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचे व्याजदर 7.1 टक्क्यांवर कायम आहेत. किसान विकास पत्राच्या व्याजदरात वाढ करण्यात आलीय. 123 महिन्यांसाठी किसान विकास पत्रावर 7 टक्क्यांवरून 7.2 टक्के व्याजदर मिळणार आहे.

महागाईबाबत अपडेट-

काही खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्याने नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.41 टक्क्यांवर आला होता. ऑक्टोबरमध्ये तो 6.08 टक्के होता. श्रम आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न असलेल्या लेबर ब्युरोने शुक्रवारी एका निवेदनात ही माहिती दिली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये किरकोळ महागाई दर हा 4.84 टक्के होता. तर गेल्या महिन्यात अन्नधान्य महागाई 4.30 टक्के होती, तर ऑक्टोबरमध्ये तो 6.52 टक्के आणि नोव्हेंबर 2021 मध्ये 3.40 टक्के होता. आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक 132.5 अंकांवर स्थिर राहिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Crime: 'रुबेन वेर्णेकर' मुख्‍य सूत्रधार असण्‍याची शक्‍यता! रायकर अपहरणप्रकरणी पोलिसांचा दावा

Goa Dairy: 'सुमुल'ला 32 लाखांची मदत मग 'गोवा डेअरी'ला मदत का नाही? सरकारचा खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप

Goa Tourism: खुशखबर! गोव्यात 355 पैकी 351 शॅकना परवानगी; महिन्याभरात पर्यटकांच्या संख्येत वाढ

Goa News: गोवा अहमदाबाद विमानात बॉम्ब ठेवल्‍याची धमकी! ‘दाबोळी’, ‘मोपा’वर कडक सुरक्षा; एकाच दिवशी 85 विमानांसाठी ट्विट

Rashi Bhavishya 25 October 2024: शत्रूंपासून सावधान! प्रवासादरम्यान होऊ शकते मोठी फसवणूक; जाणून घ्या काय सांगतयं या राशीचं भविष्य

SCROLL FOR NEXT