Prime Minister Modi Dainik Gomantak
देश

सिम कार्ड संबंधी 'या' नियमात मोदी सरकारने केला मोठा बदल

केंद्र सरकारने (Central Government) आता नवे कनेक्शन घेतल्यास किंवा प्रीपेड नंबरला पोस्टमध्ये किंवा पोस्टपेडला प्रीपडेमध्ये बलण्याची प्रोसेस खूपच लवचिक बनवली आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकित मोबाईल सिम कार्ड (Mobile SIM card) संबंधी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने आता नवे कनेक्शन घेतल्यास किंवा प्रीपेड नंबरला पोस्टमध्ये किंवा पोस्टपेडला प्रीपडेमध्ये बलण्याची प्रोसेस खूपच लवचिक बनवली आहे. याशिवाय, आता तुम्हाला पहिल्याप्रमाणे कोणताही फिजिकल फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) हा फॉर्म भरण्याचे काम डिजिटल (Digital) पध्दतीने करु शकणार आहेत. अर्थात तुम्हाला घरी बसून आता हे करता येणर आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयाला अखेर मंजूरी देण्यात आली आहे.

दरम्यान, 1 रुपयामध्ये होणार काम

PIB च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे E-KYC अ‍ॅपवर आधारित असणार आहे. अर्थात कंपनीच्या अ‍ॅपवर आवश्यक ती डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहेत. ज्याच्या आधारे केवायसी होईल. त्याचबरोबर सेल्फ KYC साठी तुम्हाला केवळ १ रुपायाचा खर्च येणार आहे. KYC पोस्टपेड वरुन प्रीपेड किंवा प्रीपेड वरुन पोस्टपेड करणे खूपच सोपे होणार आहे. नव्या नियमांनुसार, जर कोणताही ग्राहक आपल्या प्रीपेड नंबरला पोस्टपेड मध्ये बदलण्यासाठी किंवा पोस्टपेडमध्ये चेंज करणार असाल तर प्रत्येकवेळी केवायसी प्रोसेस अत्यावश्यक असणार आहे. परंतु आता केवळ एकदा केवायसी करावी लागणार.

शिवाय, केवायसीसाठी कंपनी ग्राहकांना काही आवश्यक डॉक्युमेंट मागेल. यापूर्वी हे काम ग्राहकाला कस्टमर केअरमधून जावून करावे लागत होते. मात्र आता हे स्वतः ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहेत. ज्यावेळी तुमची केवायसी करता त्याला सेल्फ केवायसी म्हणता येते. हे वेबसाईटवरुन करात येऊ शकते. Self KYC द्वारे सगळ्यात आधी मोबाईल सिमकार्ड प्रोव्हायडरचे अ‍ॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करा. त्यानंतर त्यासाठी एक अल्टरनेट मोबाईल नंबर सुध्दा द्यावा लागणार आहे. जो तुमच्या ओळखीचाच असावा लागणार आहे. त्याचबरोबर वन टाइम पासवर्ड तुम्हाला येईल. यानंतर तुम्हाला त्यासाठी लॉगिन करावे लागेल. यात सेल्फ केवायसी चा पर्याय निवडावा लागणार आहे. आणि आवश्यक माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT