तालिबान मुद्द्यावर ओविसींचा पुन्हा मोदी-शहांवर निशाणा

सरकार तालिबानबाबत (Taliban) कोणतीही भूमिका का घेत नाही? जर भारताने तालिबानबाबत भूमिका घेतली नाही तर कोणीही गांभीर्याने घेणार नाही.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय राजकारण्यांना त्यांच्या सोयीनुसार मुद्दा भेटला आहे असं दिसत आहे. तो मग भाजपमधील राजकीय पुढारी असो किंवा कॉंग्रेसमधील (Congress). यातच आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी भारतात तालिबान्यांचा साक्षात्कार झाला असल्याचे दिसत आहे. ओवेसी म्हणाले की, पंतप्रधान भारतातील कट्टरातवाद्यांवर टीका का करत नाहीत? सरकारने तालिबानबाबत आपले धोरण स्पष्ट करावे. संयुक्त SCO-CSTO मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) भाषणानंतर असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, सरकारला भारताच्या परराष्ट्र धोरणाची (Foreign policy) चिंता नाही. सरकार तालिबानबाबत कोणतीही भूमिका का घेत नाही? जर भारताने तालिबानबाबत भूमिका घेतली नाही तर कोणीही गांभीर्याने घेणार नाही.

Asaduddin Owaisi
असदुद्दीन ओवेसींच्या 'एमआयएम'ची ‘मिशन यूपी’ला सुरुवात

एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी पुढे म्हणाले की, मूलतत्ववाद कोणत्याही देशासाठी हा धोकादायकच असतो. भारतातही कट्टरतावादी आहेत जे निरपराध लोकांना लिंच करतात. देशाच्या अनेक भागात हे कट्टरतावादी निरपराध लोकांना लिंच करतात परंतु पंतप्रधान त्यावर एक चकार शब्दही काढत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी काल दावा केला होता की, 2024 मध्ये तेलंगणामध्ये भाजप विजयाची प्राप्त करेल. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त निर्मल जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी असदुद्दीन ओवैसी आणि त्यांच्या पक्षाचा उल्लेख करत अमित शहा म्हणाले होते की, भाजप मजलीस घाबरत नाही.

अमित शहांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर

अमित शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, फक्त एआयएमआयएम, ओवेसीवर टिका करण्यासाठी भाजप, टीआरएस, काँग्रेसचे नेते आसुसलेले असतात. मी त्यांना सांगू इच्छितो की, आपण अल्लाह सोडून कोणालाही घाबरत नाही.

ओवीसी यांनी म्हटले की, अमित शाह यांनी चारमीनार परिसरात खूप प्रचार केला होता, तरीही ते हरले होते. त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चारमीनार परिसरात चार तास प्रचार केला होता. लोकशाहीत भीती हा शब्द का सातत्याने पुढे येत आहे? भिती तर अल्पसंख्याकांना वाटली पाहिजे. तुम्ही बहुसंख्य आहात, वरून सत्ता तुमच्यासोबत आहे, तरीही तुम्ही बहुसंख्यांक समाज कसा भितीच्या सावटाखाली आहे ते सांगत आहात?

Asaduddin Owaisi
Breaking: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

तेलंगणामध्ये भाजपला टीआरएस पर्याय

गृहमंत्री म्हणाले होते, " देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यांनी या दिवशी तेलंगणाला स्वातंत्र्य मिळाले. भारतीय जनता पक्षाने ठरवले आहे की 2024 मध्ये तेलंगणामध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही 17 सप्टेंबरला राज्याचा अधिकृत कार्यक्रम करून हैदराबाद रिलीज डे मोठ्या थाटामाटात साजरा करू. ज्यांना भीती वाटते त्यांना घाबरु, भाजप मजलिसच्या लोकांना घाबरत नाही. तुष्टीकरणाचे राजकारण करु नका. "

अमित शहा म्हणाले होते की, काँग्रेस देशभरात पराजित होत आहे आणि तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचा (टीआरएस) पर्याय काँग्रेस असू शकत नाही, फक्त भाजप हा पर्याय असू शकतो. जर मजलिस (एआयएमआयएम) च्या भीतीमुळे काँग्रेस पर्यायी बनला तर टीआरएस जे करत आहे ते करेल. ते ओवेसींविरुद्ध लढू शकतात का? केवळ भाजपच तेलंगणाचा सन्मान वाढवू शकतो आणि इतर कोणीही नाही. "

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com