Mitchell Marsh Dainik Gomantak
देश

AUS vs SA: टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा नवा 'बॉस'! मिचेल मार्शने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू

Mitchell Marsh Record: पुढील वर्षी (2026) होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची तयारी ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार सुरु केली.

Manish Jadhav

Mitchell Marsh Record: पुढील वर्षी (2026) होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची तयारी ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार सुरु केली. याच तयारीचा एक भाग म्हणून ऑस्ट्रेलिया सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना डार्विनच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारुन एक नवा इतिहास रचला.

ऑस्ट्रेलियासाठी असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू

दरम्यान, टी-20 फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या मिचेल मार्शने नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या (Australia) डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. यासह तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू बनला.

यापूर्वी, आरोन फिंचने देखील डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, पण तो त्याने धावांचा पाठलाग (run-chase) करताना केला होता, तर मार्शने पहिल्यांदा फलंदाजी करताना हा पराक्रम केला. मिचेल मार्शला डावाचा पहिला चेंडू लुंगी एन्गिडीने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता, ज्यावर त्याने लाँग ऑफच्या दिशेने षटकार ठोकला. मार्शने सामन्याची शानदार सुरुवात केली असली, तरी त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या 7 चेंडूंत 13 धावा काढून माघारी परतला.

टीम डेव्हिडची वादळी खेळी

या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली असली तरी, एका क्षणी 75 धावांमध्येच 6 गडी गमावून संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर टिम डेव्हिडने एका बाजूने किल्ला लढवत 52 चेंडूंत 83 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्या या दमदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 178 धावांचा आव्हानात्मक स्कोर उभारता आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एकूण 13 षटकार मारले. हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) ऑस्ट्रेलियाचा संयुक्त सर्वोत्तम विक्रम आहे.

याआधी 2023 मध्ये डरबन येथे झालेल्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या डावात 13 षटकार मारले होते. मिचेल मार्शचा वैयक्तिक विक्रम आणि टिम डेव्हिडची शानदार खेळी यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात एक मजबूत धावसंख्या उभी करुन विश्वचषकाच्या तयारीसाठी एक चांगला संकेत दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड रस्त्याबाबत नवी अपडेट! 15 सप्टेंबरपासून होणार खुला; उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Shramdham Yojana: 2012 साली पर्रीकरांनी मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली, निराधारांसाठी श्रमधाम योजना राबवणारे 'तवडकर'

Mungul Crime: मुंगुल गँगवॉरमधील अनेकजण भूमीगत! मटका एजंटचा सहभाग उघड; पोलिसांना सापडले महत्त्वाचे धागेदोरे

Pernem: पेडणेची शेतजमीन ‘काडा’खाली येऊ देणार नाही! आमदार आर्लेकर; जमीन अधिसूचित असल्याचे शिरोडकरांचे उत्तर

Sawantwadi Crocodile: चिंता मिटली! 5 दिवसांनी 'मगरीला' पकडले, सावंतवाडीकरांनी टाकला सुटकेचा निःश्वास; मोती तलावात होणार 'विसर्जन'

SCROLL FOR NEXT