Crime Dainik Gomantak
देश

गर्लफ्रेंडने आधी ब्रेकअप केले, नंतर लग्नास नकार..., चिडलेल्या तरुणाने चाकूने भोसकले; 4 वर्षांच्या नात्याचा वेदनादायी अंत

दिल्लीमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मैत्री तोडून लग्नाला नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने केला.

Manish Jadhav

Delhi Crime: दिल्लीमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मैत्री तोडून लग्नाला नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने केला. हल्ल्यानंतर तरुण पळून गेल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ही घटना दक्षिण-पूर्व दिल्लीतील बदरपूर भागातील मोल्डबँड एक्स्टेंशन येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली, जेव्हा मुलगी तिच्या मित्राच्या घरी होती.

पोलिसांनी (Police) सांगितले की, दोघांचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. नुकतेच संबंध संपुष्टात आल्यानंतर मुलीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला.

मुलीच्या मानेला आणि डोक्याला दुखापत झाली

मुलीच्या मानेला आणि डोक्याला जखमा झाल्याचे त्यांनी सांगितले. तिच्यावर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

चौकशीदरम्यान, मुलीने नकार दिल्यानंतर तरुणाने तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचे उघड झाले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस तपासात गुंतले

पोलिस उपायुक्त (दक्षिणपूर्व) राजेश देव म्हणाले की, "आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 506 (गुन्हेगारी धमकावणे) आणि 452 (अतिक्रमण करणे, दुखापत करणे, हल्ला करणे किंवा घरात चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे."

ते पुढे म्हणाले की, आरोपीला (Accused) अटक करण्यात आली आहे. जखमी मुलीवर सध्या एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती ठीक असल्याचे घरातील लोकांचे म्हणणे आहे. असे असले तरी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; डिचोलीतील खळबळजनक घटना

Bhandari Samaj Committe: अशोक नाईक गटाला मोठा धक्का! महानिबंधकांनी समिती ठरवली बेकायदेशीर; भंडारी समाजातील वाद

Rashi Bhavishya 24 October 2024: प्रयत्नांतून यश मिळेल,कार्य करत रहा; आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे... जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

SCROLL FOR NEXT