Metro  Dainik Gomantak
देश

Metro Recruitment: मॅनेजर पदांसाठी नोकरीची संधी, मिळणार 1 लाखांहून अधिक पगार

Metroमध्ये मॅनेजरच्या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होणार

दैनिक गोमन्तक

Metro Recruitment 2021: मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MPMRCL) ने मॅनेजर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होईल. अच्छूक उमेदवार 5 डिसेंबर 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट www.mpmetrorail.com द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. एकूण 10 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार या संदर्भात जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

रिक्त पदांची संख्या

  • व्यवस्थापक – 4 पदे

  • सहाय्यक व्यवस्थापक – 3 पदे

  • DGM – 2 पदे

  • महाव्यवस्थापक – 1 पदे

शैक्षणिक पात्रता

व्यवस्थापकाच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तर महाव्यवस्थापक पदासाठी उमेदवाराकडे इंडस्ट्रीयल रिलेशन मैनेजमेंट डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक पात्रता माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

वयोमर्यादा

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 60 वर्षे दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखतीची तारीख आणि वेळ उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मेल आयडीद्वारे सूचित केली जाईल.

वेतनश्रेणी

महाव्यवस्थापक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना रु. 1.20 लाख ते रु. 2.80 लाख पगार मिळेल . त्याचबरोबर DGM पदासाठी उमेदवाराला 70 हजार ते 2 लाख रुपये पगार मिळेल. व्यवस्थापक (सुरक्षा, कायदेशीर, वित्त आणि खाते) या पदासाठी उमेदवाराला 60 हजार रुपये ते 1.80 लाख रुपये वेतन मिळेल. असिस्टंट मॅनेजरवर निवडलेल्या उमेदवारांना 50,000 ते 1.60 लाख रुपये पगार मिळेल.

या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा

  • अर्ज करण्याची तारीख - 10 नोव्हेंबर 2021

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 डिसेंबर 2021

  • अधिकृत वेबसाइट - www.mpmetrorail.com

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT