दिल्लीमध्ये (Delhi)26 जुलैपासून अनलॉक-8 (Unlock-8) होणार आहे. यात सूट देण्याची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. सोमवारी पहाटे 5 वाजेपासून सिनेमा हॉल, थिएटर आणि मल्टिप्लेक्स 50% उपस्थितीसह उघडण्यात सक्षम होतील. याशिवाय 100% क्षमतेसह मेट्रो आणि बस चालविल्या जाऊ शकतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने (DDMA) शनिवारी हा आदेश दिला आहे.(Metro and buses will run with full capacity from July 26 in delhi)
दिल्ली सरकारच्या (Government of Delhi) आदेशानुसार विवाह सोहळ्यात आता 50 ऐवजी 100 नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच अंत्यसंस्कार, दफनविधी आणि संबंधित विधीसाठी शंभर जणांना परवानगी देण्यात आली आहे. याअगोदर फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात अली होती. रेस्टॉरंट देखील 50 टक्के क्षमतेने सुरु केली जाणार आहे. त्यांना सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत सेवा देता येणार आहे. दिल्ली शहरातील सर्व बाजारपेठा आणि मॉलला सकाळी 10 ते 8 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच धार्मिक स्थळे सुरू केली असली तरी भाविकांना मनाई केली आहे. मात्र शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
यापूर्वी शुक्रवारी देशात 39,496 कोरोनाच्या नवीन (Corona Patients) रुग्णांची नोंद झाली. या दरम्यान, 35,124 लोकांनी साथीच्या रोगाचा पराभव केला आणि 541 लोक संसर्गामुळे मरण पावले. अशाप्रकारे, सक्रिय प्रकरणांच्या म्हणजेच उपचार घेत असलेल्यांमध्ये 3,831 ची वाढ नोंदली गेली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.