Meta Algorithm Dainik Gomantak
देश

Meta Algorithm: 'मेटा'च्या 'अल्गोरिदम'ला केंद्र सरकारचा लगाम? डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश

Government Action Plan: डीपफेक, प्रचारकी मजकूर आणि अन्य फेरफार केलेला अथवा बेकायदा कंटेंट रोखण्यासाठी ‘मेटा’ने अल्गोरिदममध्ये बदल करावेत आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा कृती आराखडा सादर करावा, अशा सूचना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने दिल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: डीपफेक, प्रचारकी मजकूर आणि अन्य फेरफार केलेला अथवा बेकायदा कंटेंट रोखण्यासाठी ‘मेटा’ने अल्गोरिदममध्ये बदल करावेत आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा कृती आराखडा सादर करावा, अशा सूचना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने दिल्या आहेत.

सरकारकडून ‘मेटा’च्या प्लॅटफॉर्मवरील डीपफेक, बाललैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट आणि अन्य हानिकारक आशयाबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर, काही दिवसांत ‘मेटा’च्या कामकाजाची छाननी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने या मुद्द्यांबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर, मेटाच्या प्लॅटफॉर्मवरील बाललैंगिक शोषण आणि डीपफेक सामग्रीशी संबंधित त्रुटींबद्दल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी यापूर्वी माफी मागितली होती. ‘मेटा’च्या तांत्रिक पथकाची शुक्रवारी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.

या बैठकीत ‘मेटा’ने आपल्या प्लॅटफॉर्मवरील हानिकारक कंटेंट शोधण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची सध्याची यंत्रणा स्पष्ट केली. मात्र, डीपफेक, प्रचारकी मजकूर आणि फेरफार केलेल्या माध्यमांचा प्रसार रोखण्यासाठी अल्गोरिदममध्ये ठोस बदल करण्याचा आग्रह अधिकाऱ्यांनी धरला.

‘मेटा’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कोणत्या वापरकर्त्याला कोणता कंटेंट दाखवायचे हे ‘मेटा’चे अल्गोरिदम ठरवितात. ‘मेटा’ स्वतः कंटेंट निवडून वापरकर्त्याला दाखवत असेल, तर ती गोष्ट त्यांच्या मध्यस्थ दर्जाशी सुसंगत आहे का, असा प्रश्न केंद्र सरकारकडून उपस्थित होत आहे.

केंद्राच्या ‘मेटा’ला सूचना

डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखणारा अल्गोरिदम सक्षम करा

हानिकारक कंटेंट रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा कृती आराखडा द्या

हानिकारक, अवैध, दिशाभूल करणारा कंटेंट वेगाने शोधून हटवण्यासाठी यंत्रणा सक्षम करा

कंटेंट हटवण्याच्या अधिकृत सरकारी यंत्रणांच्या विनंत्यांवर तातडीने कार्यवाही करा

डेटा स्थानिकीकरणाच्या नियमांचे पालन करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT