Mentally Disabled Man Burnt Alive For Insurance Claim Dainik Gomantak
देश

दिव्यांग तरुणाला जिवंत जाळले, मुलाचा मृतदेह असल्याचे सांगून हडपले 90 लाख; 17 वर्षांनंतर सत्य समोर आले

Mentally Disabled Man Burnt Alive For Insurance Claim: पैशांच्या लालसेपोटी एखादा व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतो.

Manish Jadhav

Mentally Disabled Man Burnt Alive For Insurance Claim: पैशांच्या लालसेपोटी एखादा व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतो. याचे जिवंत उदाहरण गुजरातमध्ये पाहायला मिळाले. एका व्यक्तीने आपल्या कारमध्ये एका दिव्यांग तरुणाला जिवंत जाळले आणि मृतदेह आपल्याच मुलाचा असल्याचा दावा करुन विमा म्हणून 90 लाख रुपये हडपले.

दरम्यान, त्याच्या कुटुंबात मालमत्तेवरुन वाद निर्माण झाल्यावर त्याच्याच नातेवाइकांनी पोलिसांकडे हकीकत सांगितली आणि तब्बल 17 वर्षांनंतर खोट्या मृत्यूचे रहस्य उघड झाले. अहमदाबाद पोलिसांनी (Police) तपास केला तेव्हा या घटनेचा उलघडा झाला आणि आरोपींना ओळखण्यात आले, जे फरार असल्याचे सांगितले जात आहेत.

आरोपीच्या काकानेच त्याचा पर्दाफाश केला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद (Ahmedabad) क्राइम ब्रँच पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अनिल मलिक आणि त्याचे वडील विजयपाल हे आरोपी दानकौर शहरातील परसौल गावचे रहिवासी आहेत.

मालमत्तेच्या वादातून अनिलचे काका धरमपाल यांनी हे गुपित पोलिसांसमोर उघड केले. त्यांनी सर्वप्रथम नोएडातील गौतम बुद्ध नगरच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली, मात्र पोलिसांनी हे प्रकरण मागे टाकले होते.

नोएडा पोलिसांनी कारवाई न केल्यावर धरमपाल यांनी अहमदाबाद क्राइम ब्रँचला अनिल जिवंत असल्याची माहिती दिली. क्राइम ब्रांच पोलिसांनी तपास केला असता सत्य समोर आले. अनिलचे मास्टरमाईंड वडील विजयपाल यांनी विमा कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा कट रचल्याचे उघड झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT