Mehbooba mufti warns central government Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीरबद्दल केलेली चूक मोदी सरकारने सुधारावी, अन्यथा... :मेहबूबा मुफ्ती

Taliban ला मी आवाहन करते, की असे काहीच करू नका ज्यामुळे जग तुमच्या विरोधात जाईल, असेही मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या.

दैनिक गोमन्तक

जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी तालिबानच्या विषयावर बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी केंद्र सरकारला जम्मू -काश्मीरच्या लोकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. जम्मू -काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा देण्यात यावा. तालिबान्यांनी अमेरिके साऱख्या देशाला आपला गाशा गुंडाळायला लावला, आपणही आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नका, कारण ज्या दिवशी आमची सहनशीलता संपेल त्या दिवशी तुम्ही उरणार नाही असा इशाराच मेहबूबा मुफ्ती यांनी यावेळी दिला आहे.

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, जर केंद्र सरकारला जम्मू -काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांनी जम्मू -काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करावे. काश्मिरवर संवादातून तोडगा काढला जाऊ शकतो. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी अमेरिके सारख्या देशाला पळून जाण्यास भाग पाडले.

पुढे त्या असेही म्हणाल्या की, संपूर्ण जग तालिबानच्या वागण्यावर लक्ष ठेवून आहे. त्या म्हणाल्या, "तालिबानला मी आवाहन करते, की असे काहीच करू नका ज्यामुळे जग तुमच्या विरोधात जाईल."

तालिबान बद्दल बोलताना महेबूबा मुफ्ती पुढे असेही म्हणाल्या की, तालिबान्यांनी आपली बंदुकीची भुमिका बदलली पाहिजे. तालिबान अफगाणिस्तानच्या लोकांशी कसे वागतात याकडे जगातील प्रत्येक देश लक्ष ठेवून आहे. 1947 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू -काश्मीरच्या नेतृत्वाला आश्वासन दिले होते की, आम्ही स्थानिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊ. या राज्याला विशेष दर्जा द्या. पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी दावा केला आहे की, स्वातंत्र्याच्या वेळी भाजप सरकार सत्तेत असते तर जम्मू -काश्मीर भारताचा भाग नसता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT