Mehbooba Mufti Dainik Gomantak
देश

तालिबानी सरकार शरियतनुसार चालेल, मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली आशा

तालिबानी सरकार (Taliban Government) आजच्या काळातील मूळ वास्तविकता बनला आहे. जर त्याने आपली कट्टरतावादाची प्रतिमा बदलली, तर तो जगासाठी एक उदाहरण बनू शकतो.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानचे सरकार (Taliban Government) स्थापन झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्यानंतर आता जम्मू -काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी कुलगाममध्ये (Kulgam) एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, तालिबानी सरकार आजच्या काळातील मूळ वास्तविकता बनला आहे. जर त्याने आपली कट्टरतावादाची प्रतिमा बदलली, तर तो जगासाठी एक उदाहरण बनू शकतो.

मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, तालिबान एक वास्तव म्हणून जगासमोर समोर येत असून त्यांनी हे पाहिले पाहिजे की, त्यांची पहिल्यांदा जी प्रतिमा बनली होती ती, मानवतेच्या विरोधात होती, परंतु ते आता पुन्हा एकदा नव्याने अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करत आहेत त त्यांनी आपल्या प्रतिमेत अमूलाग्र बदल केला पाहिजे. बाकी खरे शरियामध्ये म्हटले आहे की, जे मदीनाचे जे मॉडेल राहिले त्यानुसार तालिबानने शासन करावे. म्हणून जर त्यांना शरिया कायद्यानुसार शासनव्यस्थेची स्थापना करत त्याची अमलंबजावणी केली तर ते जगासाठी एक उदाहरण ठरु शकते.

ते पुढे म्हणाले की, खुदा ना खस्ता, जर त्याने गेल्या काही वर्षांतील त्याची मूळ पद्धत स्वीकारली, तर ते केवळ संपूर्ण जगासाठीच नव्हे तर अफगाणिस्तानच्या लोकांसाठीही कठीण होईल. मसरत आलम यांना हुर्रियतचा प्रमुख बनवण्याबाबत ते म्हणाले की, हा त्यांचा आपापसातील मुद्दा आहे. याशिवाय, ते म्हणाले की, हे केंद्र बाहेरुन लोकांना इथे आणत आहे, परंतु आम्हाला येथे बंदी म्हणून ठेवले आहे.

फारुख अब्दुल्ला यांनीही निवेदन दिले

श्रीनगर येथील एका कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला म्हणाले की, तालिबानने इस्लामिक नियमांच्या आधारे अफगाणिस्तानवर राज्य केले पाहिजे, जगातील सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, तालिबान प्रत्येकाला न्याय देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT