Mehbooba Mufti Dainik Gomantak
देश

''...पाकिस्तानशी चर्चा करावीच लागेल'': मेहबुबा मुफ्ती

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी जम्मू-काश्मीरबाबत पुन्हा एकदा पाकिस्तानचा रोष ओढवून घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरबाबत पुन्हा एकदा पाकिस्तानचा रोष ओढवून घेतला आहे. या प्रकरणी पाकिस्तानशी चर्चा करावी लागेल, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. संवादाशिवाय तोडगा निघू शकत नाही. माध्यमाशी बोलताना त्यांनी अनेक विषयांचा वेध घेतला. (Mehbooba Mufti said there was no alternative but to discuss the Jammu and Kashmir issue with Pakistan)

दरम्यान, AFSPA कायद्यामुळे काश्मीर खोऱ्यातील जनता त्रस्त झाल्याचे मुफ्ती यांनी म्हटले आहे. सुरक्षा दलांना एवढे अधिकार असतानाही सरपंच मरत आहेत, लोकांना गोळ्या घातल्या जात आहेत. मला वाटते की, आपल्याच घरात काहीतरी समस्या आहेत, त्यामुळे आपण अपयशी होत आहोत. पाकिस्तानशी चर्चा करण्याशिवाय पर्याय नाही, तुम्ही कितीही सैन्य आणले तरी तुम्हाला बोलावेच लागेल.

त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या दृष्टीने केंद्राकडून काश्मीर उद्ध्वस्त होत आहे. मुफ्ती पुढे म्हणाल्या की, ''केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरला पूर्णपणे संपवायचे आहे. केंद्र सरकारला आमचे अस्तित्व संपवायचे आहे. बहुधा ते मुस्लिम बहुसंख्य राज्य असल्यामुळे. आम्हाला सर्व बाजूंनी कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.''

माध्यमाशी बोलताना मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी भारताची (Inida) तुलना पाकिस्तानशी (Pakistan) केली. पाकिस्तानमध्ये धर्माच्या नावावर लोकांना बंदुका दिल्या जात असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. आजही त्यांची अवस्था वाईट आहे. परंतु आता भारतातही धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. तलवारी दिल्या जात आहेत, हिंदू-मुस्लिममध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तसेच, लाऊडस्पीकर वादावर प्रश्न विचारला असता मुफ्ती यांनी देशात दिसणाऱ्या पॅटर्नकडे लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, आधी हिजाबचा मुद्दा आला, नंतर लाऊडस्पीकर आला, काही दिवसांनी हलालचा मुद्दा उपस्थित केला जाईल. कारवाईच्या नावाखाली अल्पसंख्याकांच्या घरांवर बुलडोझर चालवला जात असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize: 2025 वर्षाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुशी यांना जाहीर

"गोव्यात सुविधांचा आनंद घ्या, दिल्लीत तुम्ही हे करू शकला नाहीत", केजरीवालांना भाजपचा टोला; Post Viral

भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

रतन टाटांच्या लाडक्यानं वेधलं लक्ष! सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या चर्चमध्ये ‘गोवा’ची उपस्थिती ठरली भावूक; Watch Video

Viral Video: 15 बायका, 30 मुलं आणि 100 सेवक! राजा 'मस्वाती' शाही लवाजम्यासह अबू धाबी विमानतळावर दाखल; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT