Meghalaya Mine Explosion Dainik Gomantak
देश

मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट! डायनामाईटनं घेतला 10 जणांचा जीव; अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Meghalaya Mine Explosion: मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्काई गावात एका बेकायदेशीर कोळसा खाणीत बुधवारी (5 फेब्रुवारी) भीषण स्फोट झाला.

Manish Jadhav

Meghalaya Mine Explosion: मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्काई गावात एका बेकायदेशीर कोळसा खाणीत बुधवारी (5 फेब्रुवारी) भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोट इतका शक्तीशाली होता की, खाणीचा काही भाग कोसळला आणि कामगार ढिगाऱ्याखाली अडकले.

प्राथमिक माहितीनुसार, मृत पावलेले सर्व कामगार शेजारील आसाम राज्यातील रहिवासी होते. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शिलाँग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खाणीत काम सुरु असताना डायनामाईटचा वापर केल्यामुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की आसपासच्या टेकड्यांनाही त्याचे हादरे बसले. यामुळे बचाव कार्यात सुरुवातीला अनेक अडथळे निर्माण झाले. आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार दबले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, खाण अतिशय दुर्गम भागात असणे, कोसळलेला ढिगारा अस्थिर असणे आणि खराब हवामान यामुळे मदत कार्यात मोठी अडचण येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे पूर्व जैंतिया हिल्स परिसरातील बेकायदेशीर कोळसा खाणींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या भागात कोळसा (Coal) खाणींवर कायदेशीर बंदी आणि अनेक निर्बंध असतानाही अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे या दुर्घटनेने सिद्ध केले आहे. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, या बेकायदेशीर खाणकामात सहभागी असलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या भीषण अपघातामुळे कामगारांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरात संतापाचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT