Blackbuck Death Dainik Gomantak
देश

Blackbuck Death: धक्कादायक! 1 नाही 2 नाही... 28 काळविटांचा मृत्यू! राज्यात पहिल्यांदाच असा संसर्ग, वनमंत्र्यांनी दिले कठोर चौकशीचे आदेश

28 Blackbucks Die In Belagavi Zoo: बेळगावजवळील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी झूमध्ये गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळविटांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.

Manish Jadhav

28 Blackbucks Die In Belagavi Zoo: बेळगावजवळील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी झूमध्ये गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळविटांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना अत्यंत गंभीर असून एका संरक्षित हरणाच्या प्रजातीचा एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू झाल्यामुळे वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी तातडीने या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

काळविटांच्या सामूहिक मृत्यूने चिंता

भूतरमणहट्टी गावात असलेल्या या मिनी झूमध्ये एकूण 38 काळवीट होते, जे नुकतेच गदग येथील बिनकडकट्टी प्राणीसंग्रहालयातून आणले होते. या काळविटांचे वय साधारण चार ते सहा वर्षांदरम्यान होते.

यातील, गुरुवारी (14 नोव्हेंबर) आठ काळवीट दगावले. त्यानंतर, वन अधिकाऱ्यांनी तात्काळ दक्षता घेतली आणि उर्वरित कळपाला निरीक्षणाखाली ठेवले. बंगळूरु आणि म्हैसूर येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या उपचारांचा फारसा फायदा झाला नाही आणि शनिवारी (16 नोव्हेंबर) सकाळी आणखी 20 काळविटांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे, केवळ तीन दिवसांत 28 काळवीट दगावले.

मृत्यूचे कारण 'बॅक्टेरिअल इन्फेक्शन'चा संशय

वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळविटांचा एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे झाला असावा, असा प्राथमिक संशय आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण काय आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यासाठी मृत काळविटांच्या अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत आणि अहवालाची प्रतीक्षा आहे.

मिनी झूचे उपसंचालक आणि सहाय्यक वनसंरक्षक नागराज बाळेहोसूर यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "राज्यातील कोणत्याही प्राणीसंग्रहालयात अशा प्रकारचा संसर्ग यापूर्वी कधीही आढळलेला नाही. आम्हाला याची नोंद पहिल्यांदाच करावी लागत आहे." त्यांनी असेही स्पष्ट केले की, शनिवारी दगावलेल्या काळविटांपैकी तिघांचे मृतदेहही पुढील तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत.

संसर्ग रोखण्यासाठी पाऊले

बाकीच्या निरोगी काळविटांना हा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. उरलेल्या काळविटांना तात्काळ विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. तसेच, ज्या पिंजऱ्यात काळविटांचा मृत्यू झाला, तो पिंजरा सध्या सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आला आहे. बाळेहोसूर यांनी सांगितले की, संपूर्ण परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

दरम्यान, कर्नाटक प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने नियुक्त केलेले पशुवैद्यकीय डॉक्टर या प्राण्यांची नियमित तपासणी करत होते की नाही, याबद्दल वन अधिकाऱ्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

वनमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी बंगळुरु येथे निवेदन जारी करत या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणाच्या तज्ज्ञ समितीमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.

खंड्रे यांनी स्पष्ट केले की, काळविटांचा मृत्यू दूषित पाणी, खराब झालेले खाद्य किंवा मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांकडून पसरलेल्या संसर्गामुळे झाला आहे का, याची ही तज्ज्ञ समिती सखोल चौकशी करेल.

मंत्री खंड्रे यांनी कठोर शब्दात बजावले, "प्राणीसंग्रहालयात प्राण्यांचा मृत्यू होणे हे गंभीर आहे आणि कर्मचाऱ्यांनी अशा घटना पुन्हा घडू नयेत याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. जर या चौकशीत कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आढळला, तर त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History of Bread: 14000 वर्षांपूर्वी बनलेला पाव, रुजला गोमंतकीयांच्या खाद्यसंस्कृतीत; जगभरात त्याचे किती आहेत प्रकार? वाचा..

Kunbi Kirat Kathiyawadi: पारोडा टेकडीवरील आजचा भूतनाथ हा त्या मूळ वेळीप देवतेचा अवशेष असावा; गुंतागुंतीचा इतिहास

Fishing Women India: ‘जाय गे'? डोक्यावर ‘पाटलो’ आणि मासळी घेऊन दारोदारी सकाळी येणारी ‘नुस्तेकान्नी’; सागरकन्येचा संघर्ष

Pooja Naik: नोकरी घोटाळ्यात नवा ट्विस्ट, पूजा नाईकच्या वाढल्या अडचणी; IAS निखिल देसाईंनी पाठवली 'मानहानीची कायदेशीर नोटीस'

‘सुपरस्पेशलिटी’ हॉस्पिटलमध्ये नेत्यांचे सर्व विशेष उपचार केल्याने, जनतेच्या हॉस्पिटलांमध्ये खाटा मोकळ्या राहतील, ही काय कमी समाजसेवा आहे?

SCROLL FOR NEXT