Rekha Singh
Rekha Singh Twitter
देश

Galwan Valley Clash: शहीद दीपक सिंह यांची पत्नी सैन्यात अधिकारी होणार

दैनिक गोमन्तक

गलवान व्हॅलीचे शहीद जवान दीपक सिंग (Martyr Soldier Deepak Singh) यांच्या पत्निने लष्कराची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (Officers Training Academy), चेन्नईमध्ये प्रवेश केला आहे. एक वर्षाच्या प्री-कमिशनिंग प्रशिक्षणानंतर तिची लष्करात लेफ्टनंट (अधिकारी) म्हणून नियुक्ती केली जाईल. रेखा सिंह (Rekha Singh) यांचे पती गलवान खोऱ्यातील हिंसाचारात चिनी सैन्याशी लढताना शहीद झाले होते. लष्कराच्या मेडिकल कॉर्प्सचे दीपक कुमार यांनी जखमी सैनिकांवर केवळ उपचारच केले नाहीत तर चिनी सैनिकांचा मारा ही सहन केला होता. त्यांच्या अदम्य साहस आणि शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. (Galwan Clash Martyr Soldier Wife Become Lieutenant)

रेखा सिंगच्या OTA चेन्नईमध्ये दाखल झाल्याबद्दल, लष्कराच्या आर्मी ट्रेनिंग कमांडने (RTK) ट्विट केले, "आम्ही रेखा सिंगच्या प्रेरणादायी धैर्य आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि आदर, धैर्य आणि समर्पणाने पुढे जाण्याच्या दृढनिश्चयाचे कौतुक करतो." गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2021 मध्ये, रेखा सिंह यांना राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्या पतीला मिळालेला वीरचक्र पुरस्कार स्विकारला.मध्य प्रदेशातील रीवा येथील सासरे आणि दिर प्रकाश सिंह यांच्यासोबत ती राजधानी दिल्लीत पोहोचली होती.

नवऱ्याच्या हौतात्म्याचा अभिमान, पण सोबत नसल्याचं दु:ख

वीरचक्र मिळाल्यानंतर रेखा सिंह यांनी सांगितले की, मला माझे पती दीपक कुमार यांच्या शौर्याचा नक्कीच अभिमान आहे. पण ते आता माझ्यासोबत नाही याचे मला दु:ख आहे. नयक दीपक सिंह यांचे बंधू प्रकाश सिंह हे देखील सैन्यातून निवृत्त झाले असून त्यांना आपल्या धाकट्या भावाच्या हौतात्म्याचा अभिमान वाटत असून, लहान भावामुळे आज संपूर्ण जग त्यांना ओळखत आहे, असे ते म्हणाले. नाईक दीपक सिंग हे आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये (AMC) होते आणि ऑपरेशन स्नो-लेपर्ड दरम्यान 16 बिहार रेजिमेंटशी 'संलग्न' होते.

जखमी असूनही 30 जवानांवर उपचार केला

लष्कराच्या प्रशस्तीपत्रानुसार, "नायक दीपक सिंगआर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये (AMC) होते आणि ऑपरेशन स्नो-लेपर्ड दरम्यान 16 बिहार रेजिमेंटमध्ये तैनात होते. 15 जून (2020) च्या रात्री गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्याची भारतीय सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत दीपक सिंह देखील जखमी झाले होते. मात्र जखमी असूनही त्यांनी सुमारे ३० सैनिकांवर उपचार केले आणि त्यानंतर देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या अनुकरणीय साहस आणि कार्यासाठी त्यांना वीर चक्र प्रदान करण्यात आले." युद्धाच्या वेळी किंवा अशांततेच्या वेळी शत्रूविरूद्ध अनुकरणीय धैर्यासाठी वीर चक्र दिले जाते.

गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैनिकांशी चकमक

भारतीय लष्कराने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच मे 2020 मध्ये पूर्व लडाखमधील एलएसीवरील चिनी लष्कराच्या आक्रमकतेविरोधात ऑपरेशन स्नो लेपर्ड सुरू केले होते. त्याच वेळी, गलवान खोऱ्यातील हिंसाचारात भारतीय लष्कराच्या बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 जवान शहीद झाले होते. या 20 जवानांमध्ये नाईक दीपक सिंग यांचाही समावेश होता. या संघर्षात चिनी सैन्याचेही मोठे नुकसान झाले. चीनने कधीही मृतांची आकडेवारी जाहीर केली नसली तरी, गलवान खोऱ्यातील हिंसाचारासाठी चीनने गेल्या वर्षी आपल्या पाच सैनिकांना शौर्य पदके दिली. यापैकी चार मरणोत्तर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

Vasco News : चिखलीत बिल्डरने अवैधपणे बनवली पार्किंगसाठी जागा

Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

Tihar Jail: तिहार जेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

SCROLL FOR NEXT