<div class="paragraphs"><p>property case murder</p></div>

property case murder

 

Dainik Gomantak

देश

40 कोटींच्या संपत्तीसाठी महिलेची हत्या, पतीसह मुलीला अटक

दैनिक गोमन्तक

एका महिलेच्या हत्येचा उलगडा करताना कर्नाटक (Karnataka) पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये मृत महिलेचा पती आणि तिच्या मुलीचा समावेश आहे. 27 डिसेंबरच्या रात्री अर्चना रेड्डी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागील खरे कारण 40 कोटींचे असल्याचे बोलले जात आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

40 कोटींच्या मालमत्तेसाठी हत्या

पिता-पुत्रीने मृत महिलेची मालमत्ता मिळवण्यासाठी अर्चनाच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांनी (police) सांगितले. सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रारीच्या आधारे तपास करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर संपूर्ण सत्य सर्वांसमोर आले. मृत महिलेचा पती नवीन याने पाच सशस्त्र हल्लेखोरांसह पत्नीवर वार करून तिची हत्या केली. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, मृत महिलेचा पती तिच्यावर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. त्याच्यासोबत पाच जण दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या पत्नीलाही आरोपी नवीनच्या अवैध संबंधांची माहिती होती. त्याचवेळी पत्नीचे कोणाशी तरी अवैध संबंध असल्याचा संशयही पतीला होता. अनेक दिवसांपासून घरात वाद सुरू होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT