ओमिक्रॉनमुळे देशात मृत्यूची पहिली घटनाही समोर आली आहे. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल असलेल्या 52 वर्षीय रुग्णाचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 28 डिसेंबर रोजी त्यांना येथे दाखल करण्यात आले. नायजेरियातून परतल्यानंतर रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
महाराष्ट्रात आतापर्यंत 450 ओमिक्रॉन बाधित रुग्ण
गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे (corona) 5 ,368 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा मागील दिवसाच्या तुलनेत1,468 अधिक आहे. या दरम्यान 1,193 संक्रमित बरे झाले आणि 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 18,217 बाधितांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय ओमिक्रॉनचे (omicron) 198 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या 450 वर पोहोचली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.